शहरं
Join us  
Trending Stories
1
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
2
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
3
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
4
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
5
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
6
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
7
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
8
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
9
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
10
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
11
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
12
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
13
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
14
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
15
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
16
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
17
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
18
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
19
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
20
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?

कणकवली शहरातील बॉक्सेलचा अहवाल नितीन गडकरींकडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 18:00 IST

शहरातील जानवली नदी ते एस.एम.हायस्कूलपर्यंत उभारण्यात आलेल्या बॉक्सेलचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे . त्याबाबतचा अहवाल ' आरसीसी कन्सल्टंट ' कंपनीने दिला आहे . हा अहवाल भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी बुधवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सुपूर्द केला . तसेच अहवालातील निष्कर्षानुसार बॉक्सेल ऐवजी उड्डाणपूल विस्तारित करण्याची मागणी केली .

ठळक मुद्देकणकवली शहरातील बॉक्सेलचा अहवाल नितीन गडकरींकडे !प्रमोद जठार यांनी घेतली भेट ; उड्डाणपुलाची केली मागणी

कणकवली : शहरातील जानवली नदी ते एस.एम.हायस्कूलपर्यंत उभारण्यात आलेल्या बॉक्सेलचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे . त्याबाबतचा अहवाल ' आरसीसी कन्सल्टंट ' कंपनीने दिला आहे . हा अहवाल भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी बुधवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सुपूर्द केला . तसेच अहवालातील निष्कर्षानुसार बॉक्सेल ऐवजी उड्डाणपूल विस्तारित करण्याची मागणी केली .कणकवली शहरातील बॉक्सेलची भिंत जुलै महिन्यात कोसळली होती . त्यानंतर ३१ जुलै रोजी उड्डाणपूलाच्या स्लॅबचा काही भाग कोसळला होता . त्यामुळे कणकवलीकर संतप्त झाले होते. त्यानंतर प्रमोद जठार यांनी कणकवली नगरापंचायतमध्ये महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी , महामार्ग ठेकेदार यांची संयुक्त बैठक घेतली .

यात या संपूर्ण कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याचे निश्चित केले होते . त्यानुसार कोल्हापूरच्या आरसीसी कन्सल्टंट या कंपनीने शहरातील उड्डाणपूल आणि बॉक्सेलची तपासणी केली .

या तपासणीत बॉक्सेलचे संपूर्ण काम निकृष्ट झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे . तर उड्डाणपुलाचा स्लॅब टाकताना त्या स्लॅबला पुरेसे सपोर्ट आहेत की नाही हे ठेकेदाराने पाहिले नाही . ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे हा स्लॅब कोसळल्याचे नमूद करण्यात आले आहे. आरसीसी कन्सल्टंट कंपनीचा हा अहवाल भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना सुपूर्द केला .

त्याचबरोबर संपूर्ण बॉक्सेल काढून टाकून तेथे फ्लायओव्हर विस्तारित करण्याची मागणी केली . कणकवली शहरात उड्डाणपुलाची मागणी गडकरी यांनी मंजूर केली होती . त्यामुळे फ्लायओव्हर विस्तारीकरणाचीही मागणी ते पूर्ण करतील असा विश्वास जठार यांनी व्यक्त केला आहे .

 

टॅग्स :highwayमहामार्गKankavliकणकवलीPramod Jatharप्रमोद जठारNitin Gadkariनितीन गडकरीsindhudurgसिंधुदुर्ग