शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

कूळ कायदा कलम ४३ ची अट रद्द; महसूल जत्रेअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 16:23 IST

collector, kolhapurnews इनाम जमिनींसाठी असलेल्या कूळ कायदा कलम ४३ ची अट महसूल विभागाकडून रद्द करण्यात येत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची परवड थांबणार आहे.

ठळक मुद्दे महसूल जत्रेअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांचे पाऊल दीड लाख शेतकऱ्यांना फायदा

इंदुमती गणेशकोल्हापूर : इनाम जमिनींसाठी असलेल्या कूळ कायदा कलम ४३ ची अट महसूल विभागाकडून रद्द करण्यात येत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची परवड थांबणार आहे.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आदेशानुसार महसूल जत्रेअंतर्गत हा पहिला महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, त्याचा लाभ जिल्ह्यातील दीड लाखावर शेतकऱ्यांना होणार आहे. सध्या या प्रक्रियेमध्ये दोन हजार अर्ज असून ११२ खातेदारांचे आदेश तयार झाले आहेत; तर ११ प्रकरणांमध्ये जमीन वर्ग १ मध्ये समाविष्टही झाली आहे.महसूल विभागाचा कारभार पारदर्शी व्हावा, नागरिकांना वारंवार कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, कमीत कमी त्रास व्हावा हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून महसूल जत्रा सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत विभागाशी संबंधित ११६ विषय असून त्याची सुरुवात कूळ कायदा कलम ४३ ची अट रद्द करण्यापासून झाली आहे.इनाम जमिनी वर्ग २ मध्ये असल्याने बांधकाम, तारण, कर्ज अशा निर्णयांसाठी महसूल खात्याची परवानगी घ्यावी लागते. यात अनेकदा खातेदारांची परस्पर फसवणूक होते, गैरव्यवहार होतात. नागरिकांचा हा मनस्ताप टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा विषय हाती घेतला.

अट रद्दसाठी विभागाकडूनच जमिनींची कागदपत्रे, सातबारा शोधणे, गट नंबर, क्षेत्र आकार, ३२ एमला किती वर्षे झाली, जमिनींचे काही व्यवहार झालेत का, कोर्टकचेरी सुरू आहे का, अशी सगळी माहिती शोधली जात आहे. ज्या जमिनींबाबत कोणत्याही तांत्रिक अडचणी नाहीत, अशा जमिनींचा वर्ग १ मध्ये समावेश केला जात आहे.वर्ग १ साठी अटज्या जमिनींवर कोणतीही कोर्टकचेरी सुरू नाही, ज्यांना ३२ एम प्रमाणपत्र मिळून १० वर्षे झाली आहेत, त्यांच्यासाठीही कूळ कायदा अट रद्द केली जात आहे.ऑनलाईन कामकाजया प्रक्रियेसाठी सॉफ्टवेअर तयार केले असून सगळा कारभार ऑनलाईन आहे. कागदपत्रे अपलोड, सातबारा, वाडी विभाजन, एकत्रीकरण, तक्ता, अर्ज, तलाठी, मंडल अधिकाऱ्यांकडून तपासणी, छाननी, मंजुरी, तहसीलदारांचा शेरा, चलन काढणे, भरणे, अध्यादेश आणि सहीनिशी आदेश ही सगळी प्रक्रिया डिजिटल आहे.दृष्टिक्षेपात क्षेत्र

  • एकूण सज्जे : ४५२
  • गावे : १ हजार ११९
  • गट : १६ हजार ७६५
  • क्षेत्र : १५ हजार ६७८ हे. आर.
  • आकारणी : ८९ हजार ३६२
  • खातेदार : ९६ हजार ४२६
  • आलेले अर्ज : ३ हजार
  • प्रक्रिया सुरू असलेली प्रकरणे : १ हजार ९९८
  • मंडल अधिकाऱ्यांपर्यंत गेलेली प्रकरणे : १ हजार २२६
  • चलनापर्यंत पोहोचलेली प्रकरणे : ९०४
  • चलन भरून अपलोड झालेली प्रकरणे : २२०
  • फेरफार आदेश तयार झालेली प्रकरणे : ११२
  • वर्ग १ मध्ये समावेश झालेली प्रकरणे : ११

जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण निर्णय

  • कुमरी शेतकऱ्यांना वनजमिनी कायमस्वरूपी वहिवाटीचा हक्क
  •  शाहूवाडीतील मौजे मरळे येथील ३५ मागासवर्गीय कुटुंबांना मालकी हक्काने जमीन
  •  चंदगडमधील हेरे सरंजाम जमिनी केल्या मालकीच्या
  • लिंगनूर दुमाला ग्रामस्थांसाठी भूखंडाचा निर्णय
  •  मातंग वसाहतीतील ४०० भूखंड मालकीचे.
टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर