हॉलमार्क कायद्यातील जाचक अटी रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:27 IST2021-08-22T04:27:11+5:302021-08-22T04:27:11+5:30

कोल्हापूर : केंद्र सरकारने लागू केलेल्या बीआयएस हाॅलमार्क कायद्यातील दागिन्यांचा ओळख क्रमांक, साठ्याची माहिती देणे या व अन्य ...

Repeal the oppressive terms in the Hallmark Act | हॉलमार्क कायद्यातील जाचक अटी रद्द करा

हॉलमार्क कायद्यातील जाचक अटी रद्द करा

कोल्हापूर : केंद्र सरकारने लागू केलेल्या बीआयएस हाॅलमार्क कायद्यातील दागिन्यांचा ओळख क्रमांक, साठ्याची माहिती देणे या व अन्य जाचक अटी रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा सराफ व सुवर्णकार संघाने केली आहे. याबाबतचे निवेदन शनिवारी खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांना देण्यात आले.

नव्या हाॅलमार्क कायद्यातील अटी सराफ सुवर्णकार व्यावसायिकांना अडचणीच्या ठरत आहेत. हाॅलमार्कला सराफांचा विरोध नाही; पण यातील जाचक अटी व कडक दंडाची तरतूद यामुळे सुवर्ण व्यवसाय मेटाकुटीस येण्याची शक्यता आहे. तरी सराफांच्या मागण्या केंद्र सरकार व संसदेपर्यंत पोहोचवण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य सराफ व सुवर्णकार फेडरेशनचे उपाध्यक्ष सुरेंद्र पुरवंत, कोल्हापूर जिल्हा सराफ व सुवर्णकार संघाचे अध्यक्ष अमोल ढणाल, उपाध्यक्ष केरबा खापणे, खजानीस अमर गोडबोले, अविनाश मुखरे, सचिन देवरुखकर, प्रमोद खांडके, संभाजी नाळे, किरण माणगावकर, सुरेश जगताप, नंदकुमार वेदपाठक, इम्तियाज शेख उपस्थित होते.

--

फोटो नं २१०८२०११-कोल-सुवर्णकार संघ

ओळ : कोल्हापूर जिल्हा सराफ व सुवर्णकार संघाच्या वतीने शनिवारी खासदार संजय मंडलिक यांना हॉलमार्क कायद्यातील जाचक अटी रद्द करण्यात याव्यात या मागणीचे निवेदन देण्यात आले.

Web Title: Repeal the oppressive terms in the Hallmark Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.