आयजीएम' मधील नादुरुस्त व्हेंटिलेटरची दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST2021-05-31T04:18:16+5:302021-05-31T04:18:16+5:30
इचलकरंजी : आयजीएम रुग्णालयामध्ये नादुरुस्त व्हेंटिलेटर पुणे येथील कंपनीमार्फत दुरुस्त करण्यात येत आहे. आमदार प्रकाश आवाडे यांच्या सहकार्यामुळे अत्यावश्यक ...

आयजीएम' मधील नादुरुस्त व्हेंटिलेटरची दुरुस्ती
इचलकरंजी : आयजीएम रुग्णालयामध्ये नादुरुस्त व्हेंटिलेटर पुणे येथील कंपनीमार्फत दुरुस्त करण्यात येत आहे. आमदार प्रकाश आवाडे यांच्या सहकार्यामुळे अत्यावश्यक असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याचे आवाडे यांनी निदर्शनास आणून दिले होते. जिल्हा प्रशासनाची वाट न पाहता पुणे येथील खासगी कंपनी इंडिकेट मेडिकल सिटी यांच्यामार्फत दुरुस्त करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. दिवसभरात तीन ते चार व्हेंटिलेटर दुरुस्ती करून रुग्णांना वापरण्यास देण्याची ग्वाही कंपनीचे टेक्निशियन संजय शिरवाळे यांनी दिली.
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या गळतीचे काम व वैद्यकीय कर्मचारयांना व्हेंटिलेटर हाताळण्याचे प्रशिक्षण देणार आहे. या कामासाठी सुमारे सात दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे कंपनीमार्फत सांगण्यात आले. या वेळी आमदार प्रकाश आवाडे, जि.प.सदस्य राहुल आवाडे, आरोग्य सभापती संजय केंगार, कपिल शेळके, आदी उपस्थित होते.