नंद्याळ - अर्जुनवाडा दरम्यानचा धोकादायक पूल त्वरित दुरुस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:28 IST2021-08-25T04:28:25+5:302021-08-25T04:28:25+5:30
कोरोना संसर्गामुळे कर्नाटकमधून राज्य वाहतूक बंदी असल्याने गडहिंग्लज,आजरा व गोव्याला जाण्याकरिता पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गाला समांतर ...

नंद्याळ - अर्जुनवाडा दरम्यानचा धोकादायक पूल त्वरित दुरुस्त करा
कोरोना संसर्गामुळे कर्नाटकमधून राज्य वाहतूक बंदी असल्याने गडहिंग्लज,आजरा व गोव्याला जाण्याकरिता पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गाला समांतर व जवळचा महामार्ग म्हणून हा रस्ता आहे. दिवसेंदिवस या मार्गावर वाहतुकीत मोठी वाढ होत आहे.
महापुराने नंद्याळ व अर्जुनवाडा दोन्ही गावातील रस्त्यावरील पुलाचा भराव खचला असून भिंती कोसळल्या आहेत. तसेच दोन्ही गावातील छोट्या साकवअभावी रस्त्यावर पाणी तुंबत आहे. पूल व रस्ता नादुरुस्त झाल्याने अपघातात वाढ होत आहे.यामुळे तत्काळ दुरुस्ती होणे गरजेचे आहे.
यावेळी माजी उपसरपंच विशाल कुंभार, ग्रा.पं.सदस्य आनंदराव फगरे, संजय वांगळे, दत्तात्रय गौड, कल्लाप्पा धनगर,उत्तम अस्वले, संजय धनगर, सिद्धू धनगर, अनिल सातवेकर आदी उपस्थित होते.