शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

जिल्ह्यात रिपरिप, धरणक्षेत्रात जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 00:15 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू राहिली. गगनबावडा, चंदगड, शाहूवाडीत जोरदार पाऊस झाला असून, २० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. ‘राधानगरी’, ‘घटप्रभा’, ‘कोदे’ धरणांबरोबरच रविवारी ‘कुंभी’ धरणातून विसर्ग सुरू झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.शनिवार (दि. ७) च्या तुलनेत रविवारी पावसाचे प्रमाण थोडेसे वाढले. ...

कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू राहिली. गगनबावडा, चंदगड, शाहूवाडीत जोरदार पाऊस झाला असून, २० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. ‘राधानगरी’, ‘घटप्रभा’, ‘कोदे’ धरणांबरोबरच रविवारी ‘कुंभी’ धरणातून विसर्ग सुरू झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.शनिवार (दि. ७) च्या तुलनेत रविवारी पावसाचे प्रमाण थोडेसे वाढले. सकाळपासूनच रिपरिप सुरू राहिली. दिवसभर कमी प्रमाणात असेना; पण पाऊस कायम राहिला. सायंकाळनंतर पाऊस वाढत गेला. रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्णात सरासरी २२.८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ५८.५०, शाहूवाडी तालुक्यात ५१.३३, तर चंदगडमध्ये ४५.८३ मिलिमीटर झाला. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणक्षेत्रात ७४, वारणा ५३, दूधगंगा ५१, कासारी ९१, कडवी ६८, घटप्रभा १९०; तर कोदे धरणक्षेत्रात ९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पंचगंगेची पातळी २६.४ फुटांपर्यंत असून, पंचगंगेवरील सात, भोगावतीवरील चार, कासारीवरील पाच, कुंभी व दूधगंगावरील प्रत्येक एक, वेदगंगा नदीवरील दोन असे २० बंधारे पाण्याखाली गेले आहेत.जांबरे धरण भरलेचंदगड तालुक्यातील ०.८२० टीएमसी क्षमतेचे जांबरे धरण शनिवारी रात्री पूर्ण क्षमतेने भरले. जिल्ह्णात आतापर्यंत ‘घटप्रभा,’ ‘कोदे’ व आता तिसरे ‘जांबरे’ धरण भरले आहे.शाहूवाडीत पडझडीत८५ हजारांचे नुकसानकेर्ले (ता. शाहूवाडी) येथील शाळेचे पावसाने २५ हजारांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर गजानन पाटील यांच्या गोठ्याची पडझड होऊन ६० हजार असे ८५ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.इचलकरंजीत पंचगंगेच्यापातळीत घटइचलकरंजी : येथील पंचगंगा नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. मात्र, पूरपरिस्थिती लक्षात घेता नगरपालिकेचे मुख्याधिकारी व अतिरिक्त मुख्याधिकाऱ्यांनी नदीच्या पाण्यात रबरी बोटीमध्ये फेरफटका मारून आपत्कालीन व्यवस्थेची पाहणी केली. जिल्ह्याच्या पश्चिम परिसरात कोसळणाºया पावसामुळे येथील पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत शनिवारी (दि. ७) सुमारे आठ फुटांनी वाढ झाली होती. मात्र, जोर कमी झाल्यामुळे रविवारी नदीतील पाण्याची पातळी साडेतीन फुटांनी कमी झाली. असे असले तरी रविवारी मात्र शहर व परिसरात पावसाच्या हलक्या सरीकोसळल्या.कडवी खोºयात अतिवृष्टीआंबा : रविवारी दिवसभराच्या धुवाधार पावसाने कडवी खोºयाला झोडपून काढले. रविवारी सकाळी नऊ वाजता घोळसवडे, चांदोली, लव्हाळा या भागात कडवी नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. संततधारेमुळे हा परिसर जलमय झाला होता. येलूर येथील ओढ्याचे पाणी महामार्गावर आले. त्यामुळे गुडघाभर पाण्यातून वाहनांची ये-जा चालू होती. म्हावळेवाडी येथे तर गटाराअभावी शिवारातील पाणी थेट महामार्गावरून वाहत होते रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मानोली, केर्ले व पावनखिंड या ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केली.राधानगरीत व्यापाºयांची त्रेधाराधानगरी : राधानगरी तालुक्यात आज पावसाचा मोठा जोर होता. विशेषत: दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसाने येथील आठवडा बाजारात लोकांची त्रेधा ऊडाली. प्रचंड पावसामुळे ओसंडून वाहणाºया राऊतवाडी धबधब्यावर मोठी गर्दी ऊसळली होती. हजारो पर्यटकानी येथे मनमुराद भिजण्याचा व धुवांधार पाऊस झेलण्याचा आनंद घेतला. अतिऊत्साही पर्यटकाना पोलिसांच्या कारवाईचा प्रसाद मिळाला.वेदगंगा नदी पात्राबाहेरम्हाकवे : गेल्या चार दिवसांपासून काळम्मावाडी पाटगाव धरण क्षेत्रात सुरू असणाºया संततधार पावसामुळे वेदगंगेला पहिला पूर आला आहे. या नदीवरील कुरणी-मुरुगुड, सुरूपली-मळगे, बस्तवडे-आणूर, नानीबाई चिखली-कुर्ली हे चारही बंधारे पाण्याखाली गेले असून वाहतूक ठप्प झाली आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत बंधाºयावर दीड फूट पाणी होते. यातून धोकादायकपणे मोटारसायकलसह अवजड वाहतूक सुरू होती. रविवारी सकाळपासून ही वाहतूक पूर्णत: बंद झाली आहे, तर बानगे-सोनगे पूल अद्याप खुला आहे. सौंदलगा, निपाणी, चिकोडी परिसरात पावसाचा फारसा जोर नाही.तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा...हातकणंगले (४.९४), शिरोळ (५.२८), पन्हाळा (१३.१४), शाहूवाडी (५१.३३), राधानगरी (३४.५०), गगनबावडा (५८.५०), करवीर (५.१८), कागल (९.५७), गडहिंग्लज (५.४२), भुदरगड (२३.४०), आजरा (१७.००), चंदगड (४५.८३).