कोल्हापूरात साधेपणाने रेणुका देवीचा पंचगंगा स्नान सोहळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 02:43 PM2019-08-26T14:43:52+5:302019-08-26T14:45:34+5:30

वाद्यांचा गजर, जोगतींचे नृत्य आणि भाविकांच्या गर्दीत श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी साजरा केला जाणारा ओढ्यावरील रेणुका देवीचा पंचगंगा स्नान सोहळा यंदा महापुराच्या पार्श्वभूमीवर चौथ्या सोमवारी साधेपणाने पार पडला. 

Renuka Devi's Panchaganga bathing ceremony in Kolhapur | कोल्हापूरात साधेपणाने रेणुका देवीचा पंचगंगा स्नान सोहळा 

कोल्हापूरात साधेपणाने रेणुका देवीचा पंचगंगा स्नान सोहळा 

Next
ठळक मुद्देकोल्हापूरात रेणुका देवीचा पंचगंगा स्नान सोहळा महापुराच्या पार्श्वभूमीवर चौथ्या सोमवारी साधेपणाने स्नान सोहळा 

कोल्हापूर : वाद्यांचा गजर, जोगतींचे नृत्य आणि भाविकांच्या गर्दीत श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी साजरा केला जाणारा ओढ्यावरील रेणुका देवीचा पंचगंगा स्नान सोहळा यंदा महापुराच्या पार्श्वभूमीवर चौथ्या सोमवारी साधेपणाने पार पडला. 

 रेणुका देवीची पालखी जग, शांताबाई सोनाबाई जाधव, रविवार पेठ येथून बायाक्काबाई चव्हाण, गंगावेश येथून लक्ष्मीबाई जाधव, बेलबाग येथून अमृत आळवेकर यांचा जग असे सगळे जग पंचगंगा नदी घाटावर गंगा स्नानासाठी एकत्र येत हा स्नान सोहळा पार पडला.

यंदा मात्र महापुराने थैमान घातले आहे. विस्थापित झालेले नागरिक आत्ता घराकडे परतत लागले आहेत, अशा परिस्थितीत भाविक दु:खात असताना देवीचा आनंद सोहळा करणे उचित नाही. त्यामुळे हा पारंपरिक सोहळा तिसऱ्याऐवजी चौथ्या सोमवारी साजरा करण्याचा निर्णय मदनआई शांताबाई जाधव, शिवाजी आळवेकर, सुनील मेढे, दत्ता पोवार व जोगती समाजाच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला होता.

 

Web Title: Renuka Devi's Panchaganga bathing ceremony in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.