शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

Kolhapur- शिवाजी विद्यापीठाचे नामांतर: महिन्यात नाव बदला, अन्यथा..; आमदार टी.राजासिंह यांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 12:15 IST

'पानसरे यांच्या पुस्तकावर बंदी घाला'

कोल्हापूर : औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ एका झटक्यात केले, अहमदनगरचे नाव त्वरित बदलले. आता शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलण्यासाठी कोण विरोध करतंय त्यांना आम्ही पाहून घेऊ, असे आव्हान देत येत्या एका महिन्यात विद्यापीठाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे नामांतर करा अन्यथा हाच मोर्चा विधानभवनावर येईल, असा इशारा भाग्यनगरचे (तेलंगणा) आमदार टी. राजासिंह यांनी सोमवारी राज्य सरकारला दिला. तुम्ही नाव बदलले नाही तर आम्ही विद्यापीठाच्या इमारतीवर चढून नाव बदलू, असेही आव्हान त्यांनी दिले.

शिवाजी विद्यापीठाचे नामांतर करण्यासाठी हिंदू राष्ट्र समिती व हिंदू जनजागृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दसरा चौकातून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यावर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सनातन संस्थेचे प्रमुख अभय वर्तक, सत्यजित कदम, संयोजक सुनील घनवट, प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

टी. राजासिंह म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव चुकीच्या पद्धतीने घेतले तर त्यांना सोडणार नाही. हे नाव पूर्ण न घेणाऱ्यांवर सरकारने कडक कारवाई करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास असून त्यांनी अधिवेशन काळात नामांतराची प्रक्रिया पूर्ण करून येत्या महिनाभरात हे नाव बदलावे. अन्यथा विद्यापीठाच्या इमारतीवर चढून मावळे नावात बदल करतील.अभय वर्तक म्हणाले, पुरोगामी मंडळींना छत्रपतींची हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ही ओळख मिटवायची असल्यानेच ते त्यांचा उल्लेख एकेरी करतात. सत्यजित कदम म्हणाले, लोकप्रतिनिधींनीच नामविस्तारासाठी पुढाकार घ्यावा. यावेळी आनंदराव काशीद, श्रावण मोहिते, कुणाल मालुसरे, रुपाराणी निकम, जयसिंगराव शिंदे उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठ म्हणजे जेएनयूचा अवतारविद्यापीठातील छत्रपतींच्या पुतळ्यावर भगवा ध्वज नाही. तो मुद्दामहून लावला जात नाही. हे विद्यापीठ जेएनयूचा दुसरा अवतार बनले आहे. मात्र, येथे छत्रपतींच्या विचारांचे कार्य सुरू राहण्यासाठी हा लढा कायम ठेवणार असल्याचा इशारा वर्तक यांनी दिला.

पानसरे यांच्या पुस्तकावर बंदी घालागोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकातून महाराजांचा अवमान होत असल्याने या पुस्तकावर बंदी घाला, अशी मागणी वर्तक व घनवट यांनी केली.

मुख्यमंत्र्यांकडे या केल्या मागण्याशिवाजी विद्यापीठाचे नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करा, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तातडीने हा प्रस्ताव संमत करा. शासकीय दस्तऐवज, अधिसूचना व प्रमाणपत्रांमध्ये त्वरित सुधारणा करा, विद्यापीठाच्या आवारात भव्य भगवा झेंडा उभारा, ‘शिवाजी कोण होता ?’, या पुस्तकावर तत्काळ बंदी घाला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठHindutvaहिंदुत्वagitationआंदोलन