योजनेच्या माध्यमातून निराधारांच्या जीवनातील अंधार दूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:26 IST2021-07-14T04:26:59+5:302021-07-14T04:26:59+5:30
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीतर्फे दोन बैठकीत २४० प्रकरणे मंजूर झाली आहेत. लाभार्थ्यांना ...

योजनेच्या माध्यमातून निराधारांच्या जीवनातील अंधार दूर करा
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीतर्फे दोन बैठकीत २४० प्रकरणे मंजूर झाली आहेत. लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात मंजुरी आदेशाचे वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून शासन अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वसामान्यांना शासनाच्या योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहिती नसल्याने या लाभापासून ते वंचित राहतात. शहरातील एकही लाभार्थी योजनेच्या अनुदानापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन आमदार जाधव यांनी केले. यावेळी लाभार्थ्यांना मंजुरी आदेशाचे वितरण आमदार जाधव, समितीचे अध्यक्ष नरेंद्र पायमल, समिती सदस्य चंदा बेलेकर, दीपाली शिंदे, सुनील देसाई, रफिक शेख यांच्याहस्ते करण्यात आले. जयदीप पाटील यांनी स्वागत केले.
फोटो (१२०७२०२१-कोल-निराधार योजना) : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीतर्फे मंजूर लाभार्थ्यांना मंजुरी आदेशाचे पत्र आमदार चंद्रकांत जाधव यांच्याहस्ते देण्यात आले. यावेळी शेजारी नरेंद्र पायमल, चंदा बेलेकर, दीपाली शिंदे, सुनील देसाई, रफिक शेख, आदी उपस्थित होते.