भारतीय जवानांच्या बलिदानाचे स्मरण ठेवा : वैष्णवी पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:01 IST2021-02-05T07:01:28+5:302021-02-05T07:01:28+5:30
सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथे २०२० मध्ये भारतीय लष्करात सेवानिवृत्त झालेल्या जवानांचा आरंभ फौंडेशनच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात त्या ...

भारतीय जवानांच्या बलिदानाचे स्मरण ठेवा : वैष्णवी पाटील
सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथे २०२० मध्ये भारतीय लष्करात सेवानिवृत्त झालेल्या जवानांचा आरंभ फौंडेशनच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सैनिक कल्याण मंडळाचे अध्यक्ष लेफ्टनंट बी. एस. पाटील होते.
प्रारंभी अमर जवान स्मारकाला अभिवादन करून भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी निवृत्त जवान विजय पाटील, हनुमान पाटील, दीपक पाटील, केदार पाटील, अमर वासनकर तसेच मुख्याध्यापक विनोद पाटील, सीमा गणबोटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बी. एस. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास वसंत गायकवाड, संभाजी पाटील, सुनील पाटील, नीलम पाटील, विनायक बन्ने, अमोल पाटील, विद्या गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो - ३१०१२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथे भारतीय लष्करातील सेवानिवृत्त जवानांचा सत्कार वैष्णवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.