लायन्स क्लबचे कार्य उल्लेखनीय : आमदार प्रकाश आवाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:25 IST2021-02-24T04:25:51+5:302021-02-24T04:25:51+5:30
येथील लायन्स ब्लड बॅँकेच्या प्रांगणात पार पडलेल्या लायन्स गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी ...

लायन्स क्लबचे कार्य उल्लेखनीय : आमदार प्रकाश आवाडे
येथील लायन्स ब्लड बॅँकेच्या प्रांगणात पार पडलेल्या लायन्स गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी शहर व परिसरात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती व संस्थांना लायन्स गौरव पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमाचा प्रारंभ क्लबचे खजिनदार नंदकुमार बांगड यांच्या ध्वजवंदन प्रतिज्ञेने झाला. स्टार एअर (संस्थापक, संजय घोडावत), जितेंद्र चोपडा (उद्योग), मनीषा सोनी (इन्शुरन्स ॲडव्हायजर), रवी जावळे (सामाजिक), श्री महेश मानव सेवा संस्था (सामाजिक संस्था) यांना लायन्स गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
लायन्स क्लबचे अध्यक्ष महेश सारडा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमास विजयकुमार राठी, डॉ. विलास शहा यांच्यासह संस्थांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन गजानन होगाडे व संगीता सारडा यांनी केले. अमित पोद्दार यांनी आभार मानले.
फोटो ओळी
२३०२२०२१-आयसीएच-०२
इचलकरंजीत उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती व संस्थांना लायन्स गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, विजयकुमार राठी, डॉ. विलास शहा, आदी उपस्थित होते.