शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविर काळ्याबाजारात विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, तिघांची टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 10:19 IST

Crimenews Kolhapur : कोविड आजारावर जीवनदायी ठरलेल्या रेमडेसिविर या इंजेक्शनचा साठा करून काळ्याबाजारात जादा दराने विक्री करणारी तिघांची टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गजाआड केली.

ठळक मुद्देसंशयित वैद्यकीय क्षेत्राशी संबंधितस्थानिक गुन्हे अन्वेषणची सलग दुसरी कारवाई

कोल्हापूर : कोविड आजारावर जीवनदायी ठरलेल्या रेमडेसिविर या इंजेक्शनचा साठा करून काळ्याबाजारात जादा दराने विक्री करणारी तिघांची टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गजाआड केली.

सचिन दौलत जोगम (वय ३०, रा. कणेरकरनगर, सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर, मूळ गाव- गोतेवाडी, ता. धामोड, ता. राधानगरी), प्रणव राजेंद्र खैरे (२५, रा. मराठा बोर्डिंग हाउस, दसरा चौक, कोल्हापूर, मूळ गाव- यल्लाम्मा चौक, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली), प्रकाश लक्ष्मण गोते (२५, रा. राजोपाध्येनगर, सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर, मूळ गाव- गोतेवाडी, ता. धामोड, जि. कोल्हापूर), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तिघेही वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत. त्यांच्याकडून तीन रेमडेसिविर औषधांच्या बाटल्या व साहित्य, असा सुमारे १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असताना इंजेक्शनचा साठा करून काळ्याबाजारात २,३०० रुपयांना इंजेक्शन विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना मिळाली. त्यांच्या पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मदतीने बागल चौक परिसरात जयराज पेट्रोल पंपाशेजारी सापळा लावला. त्यावेळी सचिन जोगम व प्रणव खैरे या दोघांना पकडले. त्यांच्या ताब्यातून तीन रेमडेसिविर औषधांच्या बाटल्या मिळाल्या.

चौकशी करताना त्यांच्या रॅकेटमध्ये प्रकाश लक्ष्मण गोते हाही असल्याचे लक्षात आले. त्यालाही पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पो.नि. तानाजी सावंत व त्यांच्या पथकाने केली....असे होते तिघांचे रॅकेट कार्यरतअटक केलेल्यातील सचिन जोगम हा बागल चौक परिसरातील एका मेडिकल दुकानात नोकरीस आहे. ज्या लोकांना रेमडेसिविर औषधांची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी तो काळ्याबाजाराने जादा दराने उपलब्ध करून देत होता. त्याचा सहकारी प्रणव खैरे हा वैद्यकीय शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. तो बेलबाग, मंगळवार पेठेतील एका खासगी रुग्णालयात नोकरीस आहे, तर दुसरा सहकारी प्रकाश गोते, हा शिवाजी उद्यमनगरातील एका ट्रस्टच्या रुग्णालयात नोकरीस आहे. प्रकाश व प्रणव हे दोघे आपल्या रुग्णालयातील रेमडेसिविर हे औषध सचिन जोगम याला पुरवत होते व सचिन हा गरजूंना जादा दराने विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.रुग्णालयातील शिल्लक रेमडेसिविर २,३०० रुपयांनाप्रणव व प्रकाश हे दोघेही नोकरी करत असलेल्या रुग्णालयात कोविड रुग्णावर उपचार करताना शिल्लक राहिलेली रेमडेसिविर औषधे जादा दराने सचिन जोगम यास विकत होते व सचिन हेच औषध तब्बल २,३०० रुपयांना विकत असल्याचे निष्पन्न झाले.सलग दुसऱ्या टोळीचा पर्दाफाशपंधरा दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने रेमडेसिविर औषध काळ्याबाजारात विक्री करणारी चौघांची टोळी निष्पन्न करून ती गजाआड केली होती. त्यामध्ये औषध कंपनीचा एरिया सेल्स मॅनेजरसह औषध दुकानात नोकरीस असलेल्यांचा सहभाग निष्पन्न झाला होता. त्यानंतर ही तिघांच्या टोळीचा पर्दाफाश केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर