इचलकरंजीत काही इच्छुकांकडून धार्मिक तणाव

By Admin | Updated: July 23, 2015 00:01 IST2015-07-22T21:59:38+5:302015-07-23T00:01:22+5:30

मनोजकुमार शर्मा : समाजकंटकांवर करणार कारवाई

Religious Tensions from Some Interested In Ichalkaranji | इचलकरंजीत काही इच्छुकांकडून धार्मिक तणाव

इचलकरंजीत काही इच्छुकांकडून धार्मिक तणाव

इचलकरंजी : नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही इच्छुक उमेदवारांकडून धार्मिक तणाव निर्माण केला जात आहे. त्यांचे गोपनीय अहवाल तयार असून, अशा समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हा पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी दिली.शहरातील जवाहरनगरमध्ये डिजिटल फलक व झेंडा लावण्याच्या कारणावरून दोन जमावांमध्ये घोषणा-प्रतिघोषणा देत तणाव निर्माण करण्याचे प्रसंग घडले होते. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख व्यक्तींची बैठक कोल्हापूरमधील पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये झाली. कोल्हापुरातील या बैठकीसाठी उपनगराध्यक्ष रणजित जाधव, कॉँग्रेसचे गटनेते बाळासाहेब कलागते, विश्व हिंदू परिषदेचे बाळ महाराज, जवाहर छाबडा, अमर माने, शिवसेनेचे शहर अध्यक्ष धनाजी मोरे, मलकारी लवटे, मनसेचे मोहन मालवणकर, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे मेहबूब मुजावर, जाफर मुजावर, पापालाल कलावंत, शौकत मुजावर, शकील मुजावर, राजू बोंद्रे, इचलकरंजीचे पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे, अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, शिवाजी कणसे, सतीश पवार, आदी उपस्थित होते.
इचलकरंजी हे वस्त्रोद्योगातील अग्रेसर शहर असल्यामुळे याठिकाणी जातीयवादी प्रवृत्तींसारख्या अपप्रवृत्ती असणे आणि त्या वाढीला लागणे म्हणजे शहराचा विकास खुंटल्यासारखे आहे. म्हणून शहरातील लोकांनी सजगतेने याकडे पाहिले पाहिजे. इचलकरंजीसाठी येणारा विकास निधी देण्याकरिता जिल्हा प्रशासनाची महत्त्वाची भूमिका असून, अशाच तणावाचे आणि धार्मिक तेढ वाढविणारे प्रकार घडू लागले, तर विकास निधी रोखण्याविषयी गांभीर्याने विचार करावा लागेल, असेही या बैठकीत सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

...तर ११० कोटींचा
निधी रद्द करू : सैनी
यावेळी जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी, धार्मिक तेढ वाढल्यामुळे शहराचा विकास खुंटतो; मात्र इचलकरंजीत असेच घडत राहिले, तर शहरासाठी आलेला ११० कोटी रुपयांचा निधी रद्द करण्यात येईल, असा इशारा दिला.

Web Title: Religious Tensions from Some Interested In Ichalkaranji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.