धार्मिक कार्यक्रम आटोपशीर; भाविकांच्या दर्शनरांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:31 IST2020-12-30T04:31:02+5:302020-12-30T04:31:02+5:30

कोरोनाचे रुग्ण कमी आढळून येत असले तरी धोका कायम आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दत्त जयंती साेहळ्यासाठी ...

Religious programs autopsy; Darshanranga of devotees | धार्मिक कार्यक्रम आटोपशीर; भाविकांच्या दर्शनरांगा

धार्मिक कार्यक्रम आटोपशीर; भाविकांच्या दर्शनरांगा

कोरोनाचे रुग्ण कमी आढळून येत असले तरी धोका कायम आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दत्त जयंती साेहळ्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार शहरातील सर्वच दत्त मंदिरांमध्ये नियमांचे पालन करत धार्मिक कार्यक्रम झाले.

कॉमर्स कॉलेजजवळील दत्त भिक्षालिंग स्थान मंदिरात पुजारी योगेश व्यवहारे आणि युवराज कांबळे यांनी मयूरारूढ रूपातील पूजा बांधली होती. येथे सायंकाळी सहाच्या सुमारास जन्मकाळ सोहळा आणि रात्री साडेआठच्या सुमारास मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीमध्ये पालखी सोहळा झाला. दरम्यान, दिवसभर येथे भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी मुख्य प्रवेश मार्गाऐवजी आझाद चौक येथील प्रवेशद्वारातून भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला तर दर्शन घेतल्यानंतर एकविरा देवी मंदिर परिसरातून बाहेर सोडण्यात आले.

अंबाबाई मंदिरातील दत्तात्रय देवमठ संस्थान, दत्त गल्लीतील श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज मंदिर, गंगावेशमधील दत्त मंदिर, मिरजकर तिकटीजवळील एकमुखी दत्त मंदिरासह शिवाजी पेठेतील संध्यामठ गल्ली, मंगळवार पेठेतील देवणे गल्ली, बागल चौक, सानेगुरुजी वसाहतीतील संतोष कॉलनी, शाहूनगर, आर. के. नगर, रुईकर कॉलनी, विक्रमनगर, महाडिक वसाहत, सम्राटनगर येथील दत्त मंदिरात भाविक दर्शनासाठी उपस्थित होते. तसेच प्रज्ञापुरी आणि कोटितीर्थ येथील श्री स्वामी समर्थ मंदिरांतूनही सकाळपासून भाविक दर्शनसाठी येत होते.

फोटो : २९१२२०२० कोल दत्त मंदिर२

ओळी : कोल्हापूर कॉमर्स कॉलेजजवळील दत्त भिक्षालिंग स्थान मंदिरातील मयूरारूढ रूपातील पूजा बांधली होती.

फोटो : २०१२२०२० कोल दत्त मंदिर३

ओळी : कोल्हापूर कॉमर्स कॉलेजजवळील दत्त भिक्षालिंग स्थान मंदिरात भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतले.

छाया : आदित्य वेल्हाळ

Web Title: Religious programs autopsy; Darshanranga of devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.