संचारबंदीतील परवानगीने भाजीपाला उत्पादकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:24 IST2021-04-16T04:24:40+5:302021-04-16T04:24:40+5:30
जयसिंगपूर : संचारबंदीत भाजीपाला विक्रीला परवानगी असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे लिलाव बाजारात तालुक्यातील भाजीपाल्याची आवक झाली होती. ...

संचारबंदीतील परवानगीने भाजीपाला उत्पादकांना दिलासा
जयसिंगपूर : संचारबंदीत भाजीपाला विक्रीला परवानगी असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे लिलाव बाजारात तालुक्यातील भाजीपाल्याची आवक झाली होती. मात्र, ही आवक मर्यादेत होती शिवाय, शिरोळ तालुक्यातून मुंबईकडे जाणारा भाजीपालाही गुरुवारी रवाना झाला.
पंधरा दिवसाच्या संचारबंदीमुळे भाजीपाला उत्पादकांसमोर संकट उभे राहिले होते. भाजीपाला विक्रीला परवानगी मिळणार का, याबाबत संभ्रमावस्था होती. ‘अत्यावश्यक सेवे’मध्ये भाजीपाल्याचा समावेश झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे थेट मुंबईकडे जाणाऱ्या भाजीपाल्याची वाहतूक सुरळीत झाली आहे. नांदणी (ता. शिरोळ) येथील श्री शेतकरी भाजीपाला संघामार्फत गुरुवारी तीन वाहने मुंबईकडे रवाना झाली. गणेशवाडी, हेरवाड, कोथळी, मजरेवाडी, चिपरी, खिद्रापूर यासह परिसरातील टोमॅटो, काकडी, कारली, वांगी, दोडका, ढबू यासह अन्य भाजीपाला पाठविण्यात आला. जयसिंगपूर येथील लिलाव बाजारात भाजीपाल्याची आवक झाली होती. मात्र, ही आवक कमी राहिली.
------------------
चौकट - श्री शेतकरी संघाचा आधार
संचारबंदीत अत्यावश्यक सेवेत भाजीपाल्याचा समावेश करण्यात आला आहे. भाजीपाला उत्पादक, व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. नांदणी (ता. शिरोळ) येथील श्री शेतकरी भाजीपाला संघाच्या माध्यमातून भाजीपाला मुंबईकडे पाठविला जात आहे. त्यामुळे संघाचा शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे.
फोटो - १५०४२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - नांदणी (ता. शिरोळ) येथील शेतकरी भाजीपाला संघाकडून मुंबईकडे भाजीपाला पाठविण्यात आला.