शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

ए. एस. ट्रेडर्सच्या गुंतवणूकदारांना दिलासा! फेब्रुवारीत पैसे परत देण्याचा नवा वायदा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 11:39 IST

कंपनीच्या मार्केटिंग प्रमुखांनी झूम मीटिंगद्वारे गुंतवणूकदारांना दिला विश्वास

कोल्हापूर : गुंतवणूकदारांनो आजपर्यंत तुम्हाला कंपनीने वेळच्या वेळी परतावे दिले आहेत. सध्या कंपनी काहीशा अडचणीतून जात आहे; परंतु आमच्यावर विश्वास ठेवा. तुमचे सर्व परतावे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून नियमित होतील, असा विश्वास ए. एस. ट्रेडर्सच्या वतीने कंपनीच्या मार्केटिंग प्रमुखांनी झूम मीटिंगद्वारे गुंतवणूकदारांना दिला आहे. त्यासंबंधीचा व्हिडीओ सध्या गुंतवणूकदारांना शेअर केला जात आहे.या व्हिडीओमध्ये बोलणारा अधिकारी सांगतो की, आम्ही गुंतवणूकदारांचे पैसे कसे परत करायचे, याचा आराखडा तयार करीत आहे; परंतु कंपनीचे प्रमुख लोहितसिंग सुभेदार यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याने त्यांच्या जामिनासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे काही अडचणी येत आहेत.

काही गुंतवणूकदार आम्हाला वारंवार आम्ही पोलिसांकडे जाऊन तक्रार करणार, केस करणार अशी भाषा करत आहेत; परंतु तसे करून तुम्हाला तुमचे पैसे परत मिळणार नाहीत. एकदा पोलिसांत गुन्हा दाखल झाला तर तारीख पे तारीख असा व्यवहार सुरू होतो. त्यातून कंपनीचे कामही ठप्प होईल व तुमचे परतावेही परत मिळणार नाहीत. गेली दोन-तीन महिने तुम्ही संयम बाळगला आहेच. तसाच संयम यापुढेही काही दिवस बाळगावा. आम्ही तुम्हाला गेल्या आठ वर्षांपासून गुंतवणुकीवर दिलेले परतावे नियमित परत केले आहेत, तसेच यापुढेही परत केले जातील. कुणीच घाबरून जाऊ नका. अडचणीच्या काळात कंपनीला सहकार्य करा. तुमच्या सर्वांच्या विश्वासावरच कंपनी या अडचणीतून बाहेर निघू शकेल. जानेवारीअखेरपर्यंत पैशाची व्यवस्था झाल्यावर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सर्व गुंतवणूकदारांची झूम मीटिंग घेतली जाईल.नवे वायदे..कंपनीकडून दर काही दिवसांनी अशी झूम मीटिंग घेऊन पैसे परत करण्याचे वायदे दिले जात आहेत; परंतु परतावे परत मिळत नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता आहे.

असाही प्रयत्न..आतापर्यंत ज्यांना कंपनीचा प्रचंड फायदा झाला..त्यांनी काही रक्कम कंपनीकडे परत गुंतवावी.. त्यातून ज्यांचे परतावे थकीत आहेत त्यांना रक्कम परत करता येईल असाही कंपनीचा प्रयत्न आहे; परंतु त्यास फारसा कुणाकडून प्रतिसाद मिळालेला नाही.

कर्मचाऱ्यांचा पगारकंपनीच्या कोल्हापुरातील तीन कार्यालयांत काम करणारे ज्या कर्मचाऱ्यांना रोखीने पगार दिला जात होता, त्यांचाही तीन महिन्यांपासून पगार दिलेला नाही. त्यांनीही पगाराच्या मागणीसाठी तगादा लावला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरshare marketशेअर बाजार