शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
2
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
3
"कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
4
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
5
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
6
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
7
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
8
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
9
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
10
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
11
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
12
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
13
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
14
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
15
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
16
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
17
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
18
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
19
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
20
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल

सामाजिक बांधिलकीतुन बसर्गे येथे विविध जलसंधारण कामाचे लोकार्पण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 3:06 PM

गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे येथे सेवावार्धिनीच्या संस्थेच्या माध्यमातून व ऑईल अ‍ॅण्ड नॅशनल गॅस कॉर्पोरेशनच्या सामाजिक बांधिलकीतुन केलेल्या विविध जलसंधारण कामाचे लोकार्पण झाले.

ठळक मुद्देबसर्गे येथे विविध जलसंधारण कामाचे लोकार्पण  सेवावार्धिनी व ऑईल अ‍ॅण्ड नॅशनल गॅस कॉर्पोरेशनची सामाजिक बांधिलकी

गडहिंग्लज  : गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे येथे सेवावार्धिनीच्या संस्थेच्या माध्यमातून व ऑईल अ‍ॅण्ड नॅशनल गॅस कॉर्पोरेशनच्या सामाजिक बांधिलकीतुन केलेल्या विविध जलसंधारण कामाचे लोकार्पण झाले.

ओएनजीसी कंपनीचे मुख्य व्यवस्थापक संजय नंदनवार, ओएनजीसी कंपनीचे आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू विक्रम पाटील व आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू  तारीफ अहमद यांच्या हस्ते जलसंधारण कामाचे लोकार्पण झाले. यामध्ये मानिकेरी मळा येथे नवीन सिमेंट बंधारा, गोणी वसाहत येथील जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरूस्ती व मजबुतीकरण तसेच गावातील गायरान जमिनीवर सलग समतल चर ही कामे पूर्ण झाली. ही कामे पाहून ओएनजीसीचे अधिकारी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी ओएनजीसीचे आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू विक्रम पाटील यांनी मार्गदर्शन केले. पाटील म्हणाले,  खेळाडूंनी सराव करणे अत्यंत आवश्यक आहे, खेळामुळे व्यक्तीला प्रसिद्धी पैसे व आरोग्य यांचा लाभ होतो. यामुळे सर्वांनी खेळाला प्रोत्साहन देणे काळाची गरज आहे.

ओएनजीसी कंपनीचे मुख्य व्यवस्थापक संजय नंदनवार यांनी बसर्गे ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल व सेवावार्धिनी संस्थेने केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

उपस्थित विद्यार्थी, ग्रामस्थांना ओएनजीसीच्या स्वच्छता पंधरवड्यानिमित्त स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी उपस्थित असलेल्या एस. एम. हायस्कूलच्या कबड्डी व फुटबॉल खेळाडूंना ओएनजीसी कंपनीचे आंतरराष्ट्रीय खेळाडू यांनी विद्यार्थांना खेळाविषयी मार्गदर्शन केले व विद्यार्थांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.प्रास्ताविक डॉ. राजेंद्र हिरेमठ यांनी केले. सेवावार्धिनी केलेल्या कामाची माहिती हर्षन पाटील यांनी दिली तर सेवावार्धिनीचे कार्यवाह सोमदत्त पटवर्धन यांनी आभार मानले.याप्रसंगी सेवावार्धिनीचे देवदत्त टेंभेकर, जिल्हा परिषद सदस्य हेमंत कोलेकर, तलाठी रोहिदास आंधळे , ग्रामविकास अधिकारी शशिकांत कुंभार, उपसरपंच सुरेश मनिकेरी आणि विविध सहकारी संस्थाचे पदाधिकारी,एस. एम. हायस्कूलचे आजी-माजी मुख्याध्यापक, शिक्षक, आशा वर्कर, सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतWaterपाणीONGCओएनजीसीkolhapurकोल्हापूर