रेखा जरे हत्याप्रकरणी संशयित कोल्हापुरातून ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:51 IST2020-12-05T04:51:15+5:302020-12-05T04:51:15+5:30

कोल्हापूर : अहमदनगर येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणी तीन संशयितांना अटक केली ...

Rekha Jare murder suspect arrested from Kolhapur | रेखा जरे हत्याप्रकरणी संशयित कोल्हापुरातून ताब्यात

रेखा जरे हत्याप्रकरणी संशयित कोल्हापुरातून ताब्यात

कोल्हापूर : अहमदनगर येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणी तीन संशयितांना अटक केली असून, दोघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांपैकी एकाला नगर पोलिसांनी कोल्हापूर ते राधानगरी मार्गावर ताब्यात घेतल्याची माहिती पुढे आली आहे.

सोमवारी पुणे ते नगर मार्गावर जातेगाव घाट सुपा येथे रेखा जरे यांची चारचाकी गाडी आडवून त्यांची धारदार शस्त्राने हत्या केली होती. त्या प्रकरणी तपास पथके विविध ठिकाणी तपासासाठी पाठवली होती. या प्रकरणी राहुरी येथील कोल्हार येथून तिघांना अटक केली होती; तर आणखी दोघांना नगर पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले आहे. त्यांपैकी एकाला कोल्हापूर ते राधानगरी मार्गावर ताब्यात घेतल्याची माहिती पुढे आली आहे. ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव गोपनीय ठेवून तपास सुरू असल्याची माहिती नगर पोलिसांनी दिली.

(तानाजी)

Web Title: Rekha Jare murder suspect arrested from Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.