शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे पुर्नवसन करा, अन्यथा काम बंद पाडणार-श्रीपतराव शिंदे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 19:25 IST

dam, kolhapurnews गेली २१ वर्षे रेंगाळलेल्या आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे आधी पुर्नवसन करा, मगच कामास सुरुवात करा, असा इशारा माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी शनिवारी येथे दिला. पुर्नवसनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत प्रकल्पाचे काम बंद ठेवा, असे आवाहन शिंदे यांनी धरणग्रस्तांना मार्गदर्शन करताना केले.

ठळक मुद्देआंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे आधी पुर्नवसन करा मगच कामास सुरुवातमाजी आमदार श्रीपतराव शिंदे यांचा इशारा, काम बंद पाडणार

रवींद्र येसादेउत्तूर :  गेली २१ वर्षे रेंगाळलेल्या आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे आधी पुर्नवसन करा, मगच कामास सुरुवात करा, असा इशारा माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी शनिवारी येथे दिला. पुर्नवसनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत प्रकल्पाचे काम बंद ठेवा, असे आवाहन शिंदे यांनी धरणग्रस्तांना मार्गदर्शन करताना केले.यावेळी अ‍ॅड. शिंदे म्हणाले , आंबेओहळ प्रकल्पग्रस्त न्यायासाठी रस्त्यावरची लढ़ाई करीत आहेत. धरणग्रस्तांच्या पुर्नवसनाची बैठक शासकीय अधिकारी यांच्यासमवेत घेण्याचे ठरले असताना प्रकल्पाचे काम सुरू करणे अयोग्य आहे. धरणग्रस्तांचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत काम बंद ठेवा अन्यथा धरणग्रस्तांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा शिंदे यांनी दिला.यावेळी संग्राम संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव म्हणाले, २१ वर्ष पुर्नवसनासाठी लढूनही आजपर्यंत न्याय मिळाला नाही. अधिकारी हे धरणग्रस्तांसोबत बनवेगिरी करतात. पुन्हा पुन्हा नोटीसा काढून धरणग्रस्तांना वेठीस धरतात. आमचे प्रश्न सोडवा, मगच धरणाचे काम करा. अन्यथा आमचा जीव गेला तरी आता माघार नाही. काम सुरू केले तर काम बंद पाडणार.यावेळी पंचायत समिती सदस्य बाळेश नाईक, वडकशिवालेचे सरपंच संतोष बेलवाडे, सचिन पावले यांची भाषणे झाली. प्रकल्पाचे अधिकारी खट्टे, बारदेस्कर यांनी प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेतले. प्रकल्प स्थळी महादेव खाडे, नामदेव पोटे, बजरंग पुंडपळ, श्रीराम चौगुले,मधुकर पोटे यांचेसह कर्पेवाडी, होन्याळी, आर्दाळ गावातील धरणग्रस्त उपस्थित होते. 

धरणग्रस्तांनी आंबेओहळ प्रकल्पाचे पुर्नवसन न झाल्याने वाहनांच्या आडवे पडून काम बंद पाडले. पुर्नवसन होत नाही तोपर्यंत काम करू नका अशी भूमिका मांडली होती, पण त्यांना न जुमानता दुपारी तीन वाजता प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे कळताच प्रकल्पग्रस्त सांयकाळी आक्रमक झाले.

प्रकल्प अभियंता स्मिता माने, कृष्णा खोरेचे अधिकारी खट्टे, प्रकल्पाचे अधिकारी बारदेस्कर व धरणग्रस्त यांच्यात पुर्नवसन प्रश्नावरून बाचाबाची झाली. धरणग्रस्त आक्रमक होत असल्याचे पाहून पोलिसांचा फौजफाटा मागवण्यात आला.

टॅग्स :Damधरणkolhapurकोल्हापूर