शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नियम डावलून बनले अंदाजपत्रक?

By admin | Updated: April 1, 2017 00:58 IST

महापालिका पदाधिकाऱ्यांची उदासीनता : अधिकाऱ्यांचे अज्ञान स्पष्ट

भारत चव्हाण -- कोल्हापूर--महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांची उदासीनता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अज्ञान यांमुळे यंदा सन २०१७-१८ सालाचा अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया नियमांना डावलून झाल्याची बाब समोर आली असून, त्यामुळे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी उपसूचनेसह मंजूर झालेला अर्थसंकल्प कायदेशीरदृष्ट्या वैध की अवैध, असा तांत्रिक मुद्दा निर्माण झाला आहे. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प तयार करण्याची कायदेशीर पद्धत सर्वच पातळ्यांवर धुडकावून लावून तो सोयीने बनविला गेल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांतील तरतुदीनुसार महानगरपालिकांचा अर्थसंकल्प तयार करण्याची एक कायदेशीर पद्धत अस्तित्वात आहे; परंतु कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी या कायदेशीर पद्धतीलाच पद्धतशीर फाटा दिला आहे. अधिनियमांतील कलम ९९ प्रमाणे प्रत्येक वर्षी २० फेबु्रवारीच्या आत महानगरपालिकेच्या करांचे दर निश्चित करायचे असतात. प्रशासनाने त्याकरिता स्थायी सभा आणि महासभेकडे तसे प्रस्ताव द्यायचे असतात; परंतु फेबु्रवारी महिन्यात जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू असल्याचे कारण देत या महिन्यातील सभाच घेण्यात आली नाही. कोरमअभावी ती तहकूब करावी लागली. पहिली चूक पदाधिकारी, लोकप्रतिनिधींकडून झाली. विहित मुदतीत करांचे दर निश्चित करण्याची जबाबदारी टाळली गेली. त्यांनतर तब्बल एक महिना उशिरा म्हणजे २० मार्च रोजी महासभा झाली; पण या सभेतही करांचे दर निश्चित करण्याच्या प्रस्तावावर लोकप्रतिनिधींनी निर्णयच घेतला नाही. दुसरी चूक प्रशासनाकडून झाली. महासभेकडून करांचे दर निश्चित झाल्यानंतर अधिनियमातील कलम १०० प्रमाणे प्रशासनाने नवीन वर्षाच्या जमा-खर्चाचे अंदाजपत्रक तयार करायचे असते; परंतु २० मार्च रोजीच्या महासभेतही करांचे दर निश्चित झाले नसताना घाईघडबडीने आयुक्त पी. शिवशंकर यांनी २२ मार्च रोजी स्थायी समितीला नवीन वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले. जर करांचे दर निश्चितच झाले नसतील तर मग कोणत्या आधारावर हे जमा-खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले गेले, असा प्रश्न तयार होतो. तहकूब सभा २४ मार्च रोजी घेण्यात आली. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांतील तरतुदींचा भंग झाला आहे. गुरुवारी (दि. ३०) सभेच्या सुरुवातीलाच याबाबत हरकत घेतली होती; पण नगरसचिवांनी चुकीचे उत्तर देऊन सभागृहाची फसवणूक केली. अंदाजपत्रक सादर होताना व्यत्यय नको म्हणून शांत राहिलो; परंतु या चुकीच्या प्रक्रियेबाबत मी आयुक्तांना पत्र देऊन गुरुवारची सभा कायदेशीररीत्या मान्य होईल का? अशी विचारणा करणार आहे. - विजय सूर्यवंशी, गटनेता, भाजपअर्थसंकल्प ३१ मार्चपूर्वी मंजूर करायचा असल्यामुळे स्थायी समितीच्या चार सदस्यांच्या सहीने तीन दिवसांची नोटीस देऊन विशेष सभा बोलाविली होती. सभेच्या कामकाज नियमावलीत एक दिवसाची नोटीस देऊनही सभा बोलाविता येते.- दिवाकर कारंडे, नगरसचिव१ स्थायी समिती सभापतींनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतच नवीन वर्षाचा अर्थसंकल्प मांडायचा असतो. त्यासाठी ३० मार्च रोजी महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा झाली. या सभेचा अजेंडा २४ तारखेला नगरसचिव दिवाकर कारंडे यांनी प्रसिद्ध केला. २ वास्तविक सर्वसाधारण सभा बोलवायची झाली तर पूर्ण सात दिवस आधी (अजेंडा प्रसिद्ध दिवस / सभेचा दिवस वगळून) प्रसिद्ध करायचा असतो; परंतु कारंडे यांनी हा नियम पाळलेला नाही. या गोष्टीला भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी यांनी जोरदार हरकत घेतली. कमी वेळेत सर्वसाधारण सभा बोलविता येत नाही, याकडे त्यांनी दिवाकर कारंडे यांचे लक्ष वेधले. ३ यावेळी कारंडे यांनी अत्यंत चुकीचा खुलासा केला. ते म्हणाले, ही ‘विशेष सभा’असून विशेष सभा तीन दिवसांच्या नोटिसीने बोलाविता येते. कारंडे यांच्या खुलाशातून पुन्हा एक कायदेशीर प्रश्न निर्माण झाला आहे. अर्थसंकल्प हा सर्वसाधारण सभेतच मांडायचा असतो. मग गुरुवारची सभा ‘विशेष सभा’ कशी असू शकते, याचे उत्तर प्रशासनास द्यावे लागणार आहे.