केएसए वरिष्ठ लीगसाठी १७ पासून फुटबॉल संघाची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:24 IST2021-02-16T04:24:26+5:302021-02-16T04:24:26+5:30
कोल्हापूर : केएसए वरिष्ठ लीगसाठी फुटबॉल संघाच्या नोंदणीला बुधवार(दि. १७), गुरुवार (दि. १८) रोजी सुरुवात होणार आहे. १६ संघ ...

केएसए वरिष्ठ लीगसाठी १७ पासून फुटबॉल संघाची नोंदणी
कोल्हापूर : केएसए वरिष्ठ लीगसाठी फुटबॉल संघाच्या नोंदणीला बुधवार(दि. १७), गुरुवार (दि. १८) रोजी सुरुवात होणार आहे. १६ संघ यासाठी पात्र असून, त्याचे ऑफलाईन पद्धतीने नियमानुसारच अर्ज भरून घेतले जाणार आहेत.
संघ नोंदणीसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे. १७ व १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार आहे. २० फेब्रुवारीनंतर कोणत्याही स्थिती संघाची नोंदणी होणार नाही. मुदतीत नोंदणी झाली नसेल तर संबंधित संघ केएसए ‘बी’ डिव्हिजन लीग फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरेल. केएसएच्या गतवर्षातील शेवटच्या सतेज चषक फुटबॉल स्पर्धेनंतर १६ संघ मानांकनानुसार पात्र ठरले असून, ते पुढीलप्रमाणे आहेत.
मानकंन संघ गुण १ प्रॅक्टिस फुटबॉल क्लब (अ) २० २ फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ १७ ३ पाटाकडील तालीम मंडळ (अ) १७
४ शिवाजी तरुण मंडळ १७ ५ बालगोपाल तालीम मंडळ १५ ६ खंडोबा तालीम मंडळ (अ) १२
७ दिलबहार तालीम मंडळ (अ) ११ ८ बी.जी. एम स्पोर्टस् ११ ९ खंडोबा तालीम मंडळ (ब) १० १० संयुक्त जुना बुधवार पेठ ९ ११ कोल्हापूर पोलीस फुटबॉल संघ ७ १२ उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ ६ १३ पाटाकडील तालीम मंडळ (ब) ६ १४ ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ ४ १५ झुंजार क्लब ३ १६ सम्राटनगर स्पोर्टस् २