(नियोजनातील विषय) जिल्ह्यात ३७६ रुग्णालयांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:23 IST2021-01-08T05:23:04+5:302021-01-08T05:23:04+5:30

संबंधित डॉक्टरांनी ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका किंवा महापालिकेकडे रुग्णालय सुरू करण्याबाबत अर्ज करावा लागतो. त्यानंतर संबंधितांना रुग्ण दाखल करून घेता ...

Registration of 376 hospitals in the district | (नियोजनातील विषय) जिल्ह्यात ३७६ रुग्णालयांची नोंदणी

(नियोजनातील विषय) जिल्ह्यात ३७६ रुग्णालयांची नोंदणी

संबंधित डॉक्टरांनी ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका किंवा महापालिकेकडे रुग्णालय सुरू करण्याबाबत अर्ज करावा लागतो. त्यानंतर संबंधितांना रुग्ण दाखल करून घेता येतात. हा अर्ज आल्यानंतर संबंधित यंत्रणेकडून रुग्णालयाची तपासणी केली जाते तसेच संबंधित डॉक्टरांची वैद्यकीय परिषदेकडील नोंदणी, आवश्यक प्रशिक्षित कर्मचारी आहे का, ज्या पॅथॉलॉजीची परवानगी आहे त्याच शाखेचे प्रॅक्टिस केले जाते का, बायोमेडिकल वेस्टसाठी आवश्यक यंत्रणा उभारली आहे या सगळ्यांची खातरजमा करण्यात येते. तालुका वैद्यकीय अधिकारी दोन पानांची जी चेकलिस्ट आहे त्याच्या पूर्ततेची खातरजमा करून हा प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे पाठवतात. जिल्हा पातळीवर या प्रस्तावाची छाननी करून अंतिम मंजुरी दिली जाते.

चौकट

नोंदणी नसल्यास

एखाद्या डॉक्टरांनी नोंदणी न करता रुग्णालय सुरू केल्यास आणि याबाबत तक्रार आल्यास संबंधितांना सेवा बंद करण्याची नोटीस काढण्यात येते तरीही दाद न देता रुग्णालय सुरू ठेवल्यास गटविकास अधिकाऱ्यांना कळवून हा डॉक्टर बोगस असल्याचे स्पष्ट करून त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येते.

चौकट

नवीन रुग्णालयाच्या नोंदणीसाठी ३००० रुपये

दर तीन वर्षांनी नूतनीकरणासाठी १५०० रुपये

गतवर्षी नव्या २० रुग्णालयांची नोंदणी

गतवर्षी ४९ रुग्णालयांच्या नोंदणीचे नूतनीकरण

चौकट

जिल्ह्यातील तालुकावार खासगी रुग्णालये

आजरा २०

भुदरगड २९

चंदगड १६

गडहिंग्लज १६

गगनबावडा १

हातकणंगले ६२

कागल १७

करवीर ८१

पन्हाळा ४६

राधानगरी १४

शाहूवाडी ४९

शिरोळ २५

एकूण ३७६

कोट

कोल्हापूर जिल्ह्यात नोंदणी केल्याशिवाय रुग्णालय सुरू करण्याचा फारसा प्रयत्न होत नाही. कारण स्थानिक पातळीवर नागरिक जागरूक असतात. त्यामुळे रितसर ग्रामपंचायतीकडून परवानगी घेतल्यानंतर आणि जिल्हा आरोग्य कार्यालयाकडून प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरच रुग्णालये सुरू केली जातात. त्यामुळे अशा पद्धतीची कारवाई करावी लागलेली नाही.

डॉ. योगेश साळे

जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: Registration of 376 hospitals in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.