‘उपनिबंधक’चा लिपिक जाळ्यात

By Admin | Updated: November 27, 2014 00:13 IST2014-11-26T23:47:29+5:302014-11-27T00:13:57+5:30

पाच हजाराची लाच घेताना कऱ्हाडात अटक

The registrar of the 'registrar' is in the trap | ‘उपनिबंधक’चा लिपिक जाळ्यात

‘उपनिबंधक’चा लिपिक जाळ्यात

कऱ्हाड : पतसंस्थेच्या सचिवाकडून पाच हजारांची लाच स्वीकारताना उपनिबंधक कार्यालयाच्या सहकारी अधिकाऱ्याला (मुख्य लिपिक) रंगेहात पकडण्यात आले. सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपनिबंधकच्या येथील कार्यालयात बुधवारी दुपारी सापळा रचून ही कारवाई केली.
चंद्रशेखर रामचंद्र भुजबळ (रा. हमदाबाज, पो. कोंडवे, जि. सातारा) असे त्या मुख्य लिपिकाचे नाव आहे. लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील महिला पतसंस्थेचा एका कर्ज खात्यासंदर्भात न्यायालयात खटला सुरू आहे.
हे कर्ज खाते उपनिबंधक कार्यालयातील सहकारी अधिकारी चंद्रशेखर भुजबळ याच्यासमक्ष तडजोडीने बंद करण्यात आले. त्याचा मोबादला म्हणून चंद्रशेखर भुजबळ याने संबंधित पतसंस्थेच्या सचिवांकडे पाच हजार रूपयांची लाच मागितली.
याबाबत संबंधित सचिवांनी लाचलुचपतच्या सातारा कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. लाचलुचपतच्या पथकाने बुधवारी दुपारी सापळा रचला. पतसंस्थेच्या सचिवांना लाचेची रक्कम घेऊन उपनिबंधक कार्यालयात पाठविण्यात आले. कार्यालयातच चंद्रशेखर भुजबळ याने त्या सचिवांकडून पाच हजारांची लाच स्वीकारली, त्यावेळी पथकाने भुजबळला रंगेहात पकडले.
याबाबतचा गुन्हा कऱ्हाड शहर पोलिसांत नोंद करण्यात आला असून चंद्रशेखर भुजबळला ताब्यात घेण्यात आले आहे. (प्रतिनिधी)


निवडणुकीत मदत करण्याचेही आश्वासन
ज्या महिला पतसंस्थेच्या सचिवांनी लाचलुचपतकडे तक्रार केली, त्या पतसंस्थेची आगामी काळात निवडणूक होणार आहे. निवडणुकीवेळी याद्या दाखल करण्यासह इतर कामांत अडथळा न आणण्याचे आश्वासनही भुजबळने लाच मागताना सचिवांना दिले होते, अशी माहिती लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: The registrar of the 'registrar' is in the trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.