शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवांची नियमबाह्य निवड; पुन्हा प्रक्रिया राबवा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 12:10 IST

पतित पावन संघटनेची मागणी : १४ ऑक्टोबरनंतर केबिनमध्ये बसू देणार नाही

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांची नियमबाह्य निवड झाली आहे. त्यामुळे त्यांना निलंबित करावे, इतर पात्र उमेदवारांवर अन्याय झाल्याने या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, त्रयस्थ विद्यापीठाच्या तज्ज्ञ समितीतर्फे फेरनिवड प्रक्रिया राबवावी अन्यथा संघटनेतर्फ दि. १४ ऑक्टोबरला कुलगुरुंसमोर आंदोलन करण्यात येईल तसेच कुलसचिवांना केबिनमध्ये बसू देणार नाही, असा इशारा पतित पावन संघटनेचे सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.याबाबत बाजू समजून घेण्यासाठी कुलसचिव डॉ. शिंदे यांच्याशी लोकमतने संपर्क साधला. त्यावर ते म्हणाले, यासंबंधीचे कोणतेच निवेदन मला मिळालेले नाही. त्यामुळे यातील कोणत्याही आरोपाबाबत मी भाष्य करणार नाही. ते निवेदन प्रशासनास पाठवले असेल तर प्रशासनच त्याचे उत्तर देईल. माध्यमांनीही या आरोपांना फार महत्त्व देऊ नये.संपर्कप्रमुख संजीव सलगर, मधुकर मांडवकर, काकाजी मोहिते, अतुल कोईगडे, विनोद बामणकर, विठ्ठल आडूळकर, राजेंद्र पाटील, मेघश्याम जगताप आदींनी यासंबंधीच्या तक्रारी पत्रकार परिषदेत लेखी निवेदनाद्वारे केल्या. त्या अशा : कुलसचिवपदाच्या मुलाखती दि. २९ ऑगस्ट २०२३ रोजी पार पडल्या, त्यात डॉ. व्ही. एन. शिंदे यांची नेमणूक झाली, याबाबत संघटनेने काही आक्षेपार्ह बाबी राज्यपाल तसेच कुलगुरुंना निवेदन पाठवून उघडकीस आणल्या आहेत. शिक्षक संवर्गातून आले नसतानाही डॉ. शिंदे यांनी सहसंचालक कार्यालयातील तत्कालीन अधिकाऱ्यांशी संगनमत करून बेकायदेशीर पीएचडीच्या आर्थिक लाभ लागू करून फसवणूक केली. डॉ. शिंदे यांच्या सेवापुस्तकात व्हाइटनर लावून खाडाखोड केली आहे. शिंदे यांच्यावर २०१० ते २०१५ या कालावधीतील शिक्षक व शिक्षकेतर भरतीत अनियमितता केल्याचा ठपका २०१६ मध्ये तत्कालीन शिक्षण सहसंचालक सतीश देशपांडे यांच्या समितीने ठेवला आहे. दीड वर्षापूर्वीच्या कुलसचिव निवडप्रक्रियेत समितीने शिंदे यांच्यासह सर्व उमेदवार अपात्र ठरवले, मग या प्रक्रियेत ते पात्र कसे ठरले, न्यू कॉलेजचे प्राचार्य म्हणून व्ही. एम. पाटील यांची निवड बेकायदेशीर असताना ते कुलसचिव पदाच्या मुलाखतीच्या निवड समितीचे सदस्य कसे ठरले? असा प्रश्नही संघटनेने उपस्थित केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ