मतदार यादीसाठी नावनोंदणी करा : जिल्हाधिकारी दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 05:59 PM2020-11-21T17:59:31+5:302020-11-21T18:03:01+5:30

elecation, Voting, collector, kolhapur भारत निवडणूक आयोगाने आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने १ जानेवारी २०२१ पासून मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.

Register for Voter List: Collector Daulat Desai | मतदार यादीसाठी नावनोंदणी करा : जिल्हाधिकारी दौलत देसाई

मतदार यादीसाठी नावनोंदणी करा : जिल्हाधिकारी दौलत देसाई

Next
ठळक मुद्दे मतदार यादीसाठी नावनोंदणी करा : जिल्हाधिकारी दौलत देसाई १५ डिसेंबरपर्यंत दावे, हरकती स्वीकारणार

कोल्हापूर : भारत निवडणूक आयोगाने आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने १ जानेवारी २०२१ पासून मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.

मतदार यादीत नावनोंदणीसाठी पात्र, मात्र मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांना नावनोंदणी करता येणार आहे. त्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, संबंधित तहसील कार्यालयातील निवडणूक शाखा तसेच  https://www.nvsp.in/ या आयोगाच्या प्रणालीवर ऑनलाईन सादर करावे. तसेच, १५ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारले जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी दिली.


मतदार यादी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे उपलब्ध आहे. यावरील दावे व हरकती मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा संबंधित तालुक्यातील तहसील कार्यालय (निवडणूक शाखा) यांच्याकडे स्वीकारण्यात येणार आहे.

दावे हरकती स्वीकारण्याचा कालावधी : १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर
दावे, हरकती निकाली काढणे : ५ जानेवारी २०२१
मतदार यादी तपासणी : १४ जानेवारी २०२१
अंतिम मतदार यादी प्रसिद्धी : १५ जानेवारी २०२१


मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी, यादीतील नाव वगळण्यासाठी, तपशिलातील दुरुस्ती, एकाच मतदार संघात मतदार यादीच्या नोंदीचे स्थानांतर या कारणांसाठी अर्ज करता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या  https://www.nvsp.in/ या प्रणालीवर ऑनलाईन अर्ज सादर करताना मतदारांनी यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक अचूक नमूद करावेत. मतदार यादीत नावाची नोंद असेल तरच निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावता येतो. तरी आपली नोंदणी प्राधान्याने करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Web Title: Register for Voter List: Collector Daulat Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.