शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

Kolhapur Politics: ‘के. पी.’ यांच्या शिष्टमंडळाने घेतली सतेज पाटील यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 15:08 IST

विधानसभा उमेदवारीबाबत केली चर्चा : जागा कोणाला? हाच खरा गुंता

कोल्हापूर : बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांच्या समर्थक शिष्टमंडळाने शुक्रवारी आमदार सतेज पाटील यांची काँग्रेस कमिटीत भेट घेतली. विधानसभा उमेदवारीबाबत त्यांनी चर्चा केली. पण, ही जागा महाविकास आघाडीमध्ये नेमकी कोणाला जाईल, त्याचा गुंता जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत अडचणी असल्याचे सांगण्यात आले.

के. पी. पाटील हे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत आहेत. मात्र, महायुतीमध्ये ही जागा शिंदे सेनेला जाणार असल्याने त्यांची कोंडी होणार हे ओळखून त्यांनी ‘बिद्री’ कारखान्याच्या निवडणुकीपासून त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्याशी जवळीक वाढवली आहे. लोकसभा निवडणुकीत ते शरीराने महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात असले तरी ते मनाने आघाडीसोबत राहिले.त्यानंतर मात्र, त्यांनी महायुतीच्या जाहीर कार्यक्रमापासून अलिप्त राहणेच पसंत केले.गेल्या तीन-चार दिवसांत राजकीय घडामोडी वेगावल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर के. पी. पाटील यांच्या शिष्टमंडळाने सतेज पाटील यांची काँग्रेस कमिटीत भेट घेतली. उमेदवारीबाबत लवकर निर्णय घ्या, असा आग्रह होता. पण, जागा वाटप अद्याप झालेले नाही, ‘राधानगरी’च्या जागेवर काँग्रेसने अद्याप दावा सोडलेले नाही. यामध्ये ज्येष्ठ शरद पवार व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ, अशी ग्वाही पाटील यांनी दिली.शिष्टमंडळात जिल्हा बँकेचे संचालक रणजितसिंह पाटील, ‘गोकुळ’चे संचालक प्रा. किसन चौगले, ‘भोगावती’चे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील-कौलवकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मधूआप्पा देसाई, ‘बिद्री’चे संचालक राजेंद्र पाटील, उमेश भोईटे, राजू भाटले, भिकाजी एकल आदी सहभागी होते.‘ए. वाय.’ यांच्या राजीनाम्याने घालमेलजिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी ‘राम कृष्ण हरी वाजवा तुतारी’ असे स्टेटस लावल्याने ‘के. पी.’ यांच्या समर्थकांमध्ये घालमेल वाढली आहे. आघाडीची उमेदवारी ‘ए. वाय.’ यांना मिळाली तर अपक्ष राहण्याशिवाय पर्याय राहणार नाही, हेही त्यांना माहिती आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाK P. Patilके. पी. पाटीलSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील