हातकणंगले उपनिबंधक कार्यालयात एजंटांचा राबता

By Admin | Updated: November 27, 2015 01:15 IST2015-11-27T01:14:51+5:302015-11-27T01:15:11+5:30

संस्था अवसायनात : बोगस लेखापरीक्षणाद्वारे बँक खात्यावर व्यवहार दाखविण्याचा प्रयत्न

Regarding agents in the office of Hathkangala's Deputy Registrar | हातकणंगले उपनिबंधक कार्यालयात एजंटांचा राबता

हातकणंगले उपनिबंधक कार्यालयात एजंटांचा राबता

दत्त बिडकर -- हातकणंगले  उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडून १५४२ संस्था अवसायनात काढण्याची प्रक्रिया सुरू केली असल्यामुळे संस्थाप्रमुखाकडून बोगस लेखापरीक्षण तयार करून बँक खात्यावर व्यवहार दाखवण्यासाठी मांडवली केली जात आहे. उपनिबंधक कार्यालयात संस्था वाचवण्यासाठी बोली सुरू झाली आहे. यामुळे सात-आठ महिने बंद झालेला एजंटांचा राबता नव्याने सुरू झाला आहे. नव्याने संस्था नोंदणीकृत करण्याच्या जाचक अटी, वेळ व पैसा खर्च करण्यापेक्षा जुन्या संस्था वाचवण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.तालुक्यातील पत्ता सापडत नसलेल्या १५४२ संस्थांची नोंदणी रद्द करण्याची कारवाई उपनिबंधक कार्यालयाकडून सुरू आहे. दरम्यान, अवसायनात काढलेल्या संस्थांना शेवटची संधी म्हणून ३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत आपली बाजू मांडण्याची संधी दिली आहे. ज्या संस्था या तारखेपर्यंत आपले म्हणणे मांडणार नाहीत, त्यांना एक महिन्याची मुदत देऊन त्यांची नोंदणी रद्द होणार आहे.नोंदणी रद्द होवू नये म्हणून काही संस्थाप्रमुख गत पाच-दहा वर्षांचे लेखापरीक्षण करून घेत आहेत. संस्थेच्या बँक खात्यावर व्यवहार दाखवण्यासाठी मांडवली सुरू केली आहे.

नव्याने संस्था नोंदणीकृत करण्याच्या जाचक अटी आणि लागणारी कागदपत्रे, सभासद संख्या, बँक दाखला, विविध विभागांचे दाखले. वेळ आणि पैसा खर्च करण्यापेक्षा जुन्या संस्था वाचवण्यासाठी संस्थाप्रमुख धडपडत आहेत. या संस्था वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन लागेल तो खर्च करण्याची तयारी करत आहेत.

सहकार खात्याने ९७ वी घटना दुरुस्ती २०१३ मध्ये लागू केली. यावेळी बहुतेक संस्थांनी विशेष सभा घेऊन ९७ वी घटना दुरुस्ती करून आपले ठराव आणि वार्षिक माहिती उपनिबंधक कार्यालयाकडे सादर केली. २०१३ पासून नोव्हेंबर २०१५ पर्यंत सहकार खात्याने काय केले असा सवाल उपस्थित होत असून सहकार विभागाने आताच संस्था अवसायनात घेण्यासाठी प्रक्रिया का सुरू केली यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: Regarding agents in the office of Hathkangala's Deputy Registrar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.