शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

लोकमत इफेक्ट : अखेर ते दोन अंध विद्यार्थी पोहोचले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 5:28 PM

तब्बल तीन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर संचारबंदीमध्ये कोल्हापूरात अडकलेल्या हिंगोली जिल्ह्यातील दोन अंध विद्यार्थ्यांना त्यांच्या घरच्यांची भेट झाली. लोकमतच्या वृत्ताची दखल घेउन आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नांने या विद्यार्र्थ्याना त्यांच्या नातेवाईकांकडे सोमवारी सुखरुप पोहोचवण्यात आले.

ठळक मुद्देलोकमत इफेक्ट : अखेर ते दोन अंध विद्यार्थी पोहोचले घरी, तीन महिन्याच्या प्रतिक्षेची अखेरहिंगोलीत झाली घरच्यांची भेट : आमदार ऋतुराज पाटील यांनी केले प्रयत्न

कोल्हापूर : तब्बल तीन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर संचारबंदीमध्ये कोल्हापूरात अडकलेल्या हिंगोली जिल्ह्यातील दोन अंध विद्यार्थ्यांना त्यांच्या घरच्यांची भेट झाली. लोकमतच्या वृत्ताची दखल घेउन आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नांने या विद्यार्र्थ्याना त्यांच्या नातेवाईकांकडे सोमवारी सुखरुप पोहोचवण्यात आले.स्वतंत्र वाहन करुन जाण्याची ऐपत नसल्यामुळे गेले तीन महिने संचारबंदीमुळे कोल्हापूरात अडकलेले हिंगोली जिल्ह्यातील कामिनी ज्ञानेश्वर गडवे आणि अतुल विश्वनाथ भगत हे दोन अंध विद्यार्थी कोल्हापूरातच अडकले होते. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे हे दोन अंध विद्यार्थी कोल्हापूरातील विकास हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीचे शिक्षण घेत होते. मूळचे हिंगोली जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या कामिनीचे वडील शेतमजूर असून अतुलचे वडील मुंबईत रोजगार करतात.यासंदर्भात ३१ मे रोजी लोकमतने बातमी दिली होती. ती वाचून आमदार ऋतुराज पाटील यांनी या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्याची तयारी दर्शविली. हे विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेत होते त्या विकास हायस्कूलमध्ये विशेष शिक्षक असलेले अजय वणकुद्रे यांच्याशी त्यांनी संपर्क साधला आणि त्यांची प्रत्यक्ष भेट घेउन त्यांच्याशी चर्चा केली आणि जाण्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था केली.

कसबा बावडा येथील चालक युवराज कुंभार यांनी सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास या दोन विद्यार्र्थ्याना हिंगोलीत पोहोचवले. दोघांच्याही पालकांना त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांच्या डोळ्यात आसवे उभी राहिली. लोकमत आणि आमदार ऋतुराज पाटील यांचे त्यांनी आभार मानले.मास्क, सॅनिटायझरसोबत दिली कोल्हापूरची शिदोरीडॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये या विद्यार्थ्यांचे मोफत स्वॅब घेउन त्यांना हिंगोलीत पोहोचविण्याची तयारी केली. त्यांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह येताच त्यांना सॅनिटायझर, मास्क, दोघांच्याही घरी पुरतील इतके अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या, ते वापरण्याबद्दलचे सूचनापत्रक देउन त्यांना सोमवारी पहाटे हिंगोलीकडे रवाना केले. याशिवाय मिठाई, कोरडा खाउ, नाश्ता, आणि दुपारचे जेवण अशी कोल्हापूरची शिदोरीही दिली.होम क्वारन्टाईन करण्याच्या सूचनाया दोन विद्यार्थ्यांना विशेष परवानगी काढून होम क्वारन्टाईन करण्याच्या सूचना संबंधित जिल्हा प्रशासनाला देण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले आहेत. त्यांच्यासोबत स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले आहेत.

लोकमतमुळे कोल्हापूरात अडकलेल्या या दोन अंध विद्यार्थ्यांना मदत करता आली. या कठीण काळात माणुसकीच्या नात्याने त्यांना त्यांच्या घरी पोहोचवणे आवश्यक होते. माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला यामुळे प्रोत्साहन मिळाले. लोकमतचे विशेष आभार.ऋतुराज पाटील,आमदार, कोल्हापूर.

लोकमतमध्ये आलेली बातमी वाचुन या अंध विद्यार्थ्यांना मदत मिळणे गरजेचे वाटले. आमदार ऋतुराज पाटील यांना या मुलांची अवस्था सांगितली, त्यांनी तत्काळ प्रतिसाद दिला. या विध्यार्थ्यांना हिंगोली येथे गेल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात ठेवले जाऊ नये यासाठी डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्येमोफत स्वाब तपासून तसे प्रमाणपत्र सोबत दिले. यामुळे त्यांना तेथे कोणताही त्रास झाला नाही. तीन महिन्यानंतर त्यांना त्यांचे पालक भेटले यातच आम्हाला समाधान आहे. महादेव नरके, प्राचार्य, डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक, कसबा बावडा, कोल्हापूर 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRuturaj Patilऋतुराज पाटीलkolhapurकोल्हापूरHingoliहिंगोली