शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटतेय; आधुनिकीकरणाला वेग, ७७ टक्के काम पूर्ण

By संदीप आडनाईक | Updated: March 27, 2026 17:23 IST

मुख्य इमारत, पोर्च, प्रतीक्षालय, शौचालयाचे काम पूर्ण, अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू

संदीप आडनाईककोल्हापूर : अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत सुरू असलेल्या कोल्हापूररेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास कामांनी वेग घेतला असून, एकूण कामाची ७७ टक्के भौतिक प्रगती पूर्ण झाली आहे. मुख्य इमारत, पोर्टिको, प्रतीक्षालय, शौचालये यांसह अनेक कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहेत. आता रस्ता रुंदीकरण, लँडस्केपिंग, रस्ता पृष्ठभाग, पादचारी मार्गाचे नूतनीकरण या कामांना वेग आला आहे. सप्टेंबर २०२६ अखेर ही सर्व कामे पूर्ण होतील, अशी अपेक्षा रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत ४३ कोटी ३ लाखांच्या निधीतून कोल्हापूर आणि हातकणंगले या स्थानकांच्या पुनर्विकास कामांचा समावेश आहे. या निधीतून एसी वेटिंग रूम, महिला प्रतीक्षालय, नवीन शौचालय ब्लॉक, रिझर्व्हेशन ऑफिस, नवीन पोर्टिको ही कामे अंतिम अवस्थेत आहेत. प्लॅटफॉर्म सर्फेसिंगचे कामही प्राधान्याने पूर्ण झाले आहे.दरम्यान, विद्यमान इमारतीचे सुधारणा काम ८० टक्के पूर्ण झाले असून प्लॅटफॉर्म-१ वरील शेल्टर ९८ टक्के, फसाड ९७ टक्के, मुख्य प्रवेश आणि व्हीआयपी लॉबी ९५ टक्के पूर्ण झाली आहे. फूट ओव्हर ब्रिजचे काम ४७ टक्के, तर सर्क्युलेटिंग एरिया आणि पार्किंगचे काम १५ टक्के प्रगतीत आहे. प्रकाश योजना, तसेच इतर कामे सध्या सुरू आहेत. लिफ्ट, एस्केलेटर, आसन व्यवस्था, तसेच काही सार्वजनिक सुविधा ही कामे लवकरच सुरू होणार आहेत. आर्थिक प्रगती ७०.१८ टक्क्यांपर्यंत पोहोचली असून, हे काम ३१ जुलै २०२६ पर्यंत अपेक्षित आहे.

सुरू असलेली कामे- एसी वेटिंग रूम- महिला वेटिंग रूम- प्लॅटफॉर्म क्र. १ (नवीन), क्र. २ आणि ३ येथील शौचालय ब्लॉक- नवीन बुकिंग ऑफिसजवळ शौचालय- रिझर्व्हेशन ऑफिस- नवीन पोर्टिको-विद्यमान इमारतीचे काम -८०%-सर्क्युलेटिंग एरिया, पार्किंग -१५ %-फूट ओव्हर ब्रिज - ४७%-प्लॅटफॉर्म १ (नवीन) शेल्टर (सीओपी)-९८%-फसाड -९७ %-मुख्य प्रवेश व बाहेर पडण्याचे गेट-९५ %-व्हीआयपी प्रवेश लॉबी-९५%

कोल्हापूर रेल्वेस्थानकाचे आधुनिकीकरण वेगाने सुरू असून प्रवाशांना अधिक आधुनिक, स्वच्छ आणि सोयिस्कर सुविधा देण्यावर भर दिला जात आहे. - हेमंत बेहरा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Railway Station Modernization: 77% Complete, Upgrades in Progress

Web Summary : Kolhapur Railway Station's redevelopment under the Amrit Bharat scheme is 77% complete. Upgrades include new waiting rooms, toilet blocks, a reservation office, and a portico. Road widening, landscaping, and pedestrian walkway improvements are underway, aiming for completion by September 2026.