कोरोना जनजागृतीसाठी रेड क्रॉसचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:17 IST2021-06-18T04:17:14+5:302021-06-18T04:17:14+5:30
कोल्हापूर : महापालिका व विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे राबवण्यात येणाऱ्या ‘मी जबाबदार’ मोहिमेच्या जनजागृतीसाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या कोल्हापूर शाखेने ...

कोरोना जनजागृतीसाठी रेड क्रॉसचा पुढाकार
कोल्हापूर : महापालिका व विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे राबवण्यात येणाऱ्या ‘मी जबाबदार’ मोहिमेच्या जनजागृतीसाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या कोल्हापूर शाखेने पुढाकार घेतला आहे. रेड क्रॉसतर्फे पाच हजार जनजागृती स्टिकर्स जिल्हाधिकारी दौलत देसाई, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या उपस्थितीत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. यावेळी इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे अध्यक्ष श्रीनिवास मालू, उपाध्यक्ष अमरदीप पाटील उपस्थित होते.
मास्क नाही, प्रवेश नाही, सुरक्षित अंतर ठेवा, सॅनिटायझरचा वापर करा, असे संदेश असलेले हे स्टिकर्स शहरातील विविध दुकानांत लावण्यात येणार आहेत. रेड क्रॉसचे सदस्य प्रमुख बाजारपेठेत जाऊन जनजागृती करणार आहेत. संभाव्य तिसरी लाट थोपवण्यासाठी विविध उपाययोजनेसंबंधी माहिती सांगणार आहेत. रेड क्रॉस महाराष्ट्र शाखेच्या मार्गदर्शनाखाली विविध योजना राबविण्यात येत आहेत, असेही उपाध्यक्ष व्ही. बी. पाटील व सचिव सतीशराज जगदाळे यांनी सांगितले.
फोटो :१७०६२०२१-कोल-रेडक्रॉस०१
कोल्हापूर रेड क्रॉसतर्फे जनजागृतीसाठी प्रकाशित केलेल्या स्टिकर्स सुपुर्दप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अमरदीप पाटील, श्रीनिवास मालू उपस्थित होते.