शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम महाराष्ट्र देवस्थानमधील २१ कर्मचाऱ्यांची नोकरभरती बेकायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 09:05 IST

Kolhapur News: पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या कारभाऱ्यांनी लाखोंचे अर्थकारण करीत २१ कर्मचाऱ्यांची बेकायदेशीर नोकरभरती केली आहे.

- इंदुमती गणेश कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या कारभाऱ्यांनी लाखोंचे अर्थकारण करीत २१ कर्मचाऱ्यांची बेकायदेशीर नोकरभरती केली आहे. न्याय व विधि खात्याने परिपत्रकातून स्पष्टपणे आकृतिबंधाबाहेरील पदे भरू नयेत असे स्पष्ट आदेश दिलेले असताना ते धुडकावून लावत पदे भरली गेली. या प्रकरणातील चौकशी अधिकाऱ्यांनी अहवालात ही भरती बेकायदेशीर असून, त्याला समिती जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढला आहे. त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर झाला आहे. जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याची उत्सुकता आहे.देवस्थान समितीवर सात वर्षांनंतर २०१७ मध्ये अध्यक्ष, कोषाध्यक्ष सदस्यांची निवड झाली. तत्पूर्वी २००९ मध्ये १८ कर्मचाऱ्यांची बेकायदेशीर नोकरभरती झाली होती. हे कर्मचारी न्यायालयात गेल्यानंतर निकाल त्यांच्या बाजूने लागला. देवस्थानने त्यांच्या सेवा नियमित करण्यासाठी न्याय विधि खात्याकडे प्रस्ताव दिला जो मार्च २०१९ मध्ये मंजूर झाला. त्याआधीच जानेवारी महिन्यात न्याय व विधि खात्याने समितीला पत्र पाठवून आकृतिबंधाबाहेर नोकरभरती करू नये, असे बजावले होते. त्या आदेशाला केराची टोपली दाखवीत २०१७ मध्ये ठोक मानधनावर भरलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केले गेले, तसेच २०१८-१९ मध्ये शासनाचे नियम धाब्यावर बसवून २१ जणांची नोकरभरती केली. 

व्यवहार असाही..ही भरती करताना प्रत्येकी साडेसात लाखांचा व्यवहार झाला, त्यापैकी एका सदस्याने कर्मचाऱ्यांना रक्कम परत केली असे समितीतील एकाने चौकशीदरम्यान कबूल केले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर