शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

एका दिवसात वसूल केली ५९ हजार रुपये दंडाची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 14:07 IST

शहरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २८८ वाहनांवर कारवाई करून ५९ हजार रुपये दंडाची रक्कम मंगळवारी एका दिवसात वसूल केली. शहर वाहतूक शाखेच्या वतीने यापुढे अशीच कारवाईची मोहीम राबविण्यात येणार

ठळक मुद्देवाहतूक शाखेच्या पोलिसांची एका दिवसात कारवाई

कोल्हापूर : शहरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २८८ वाहनांवर कारवाई करून ५९ हजार रुपये दंडाची रक्कम मंगळवारी एका दिवसात वसूल केली. शहर वाहतूक शाखेच्या वतीने यापुढे अशीच कारवाईची मोहीम राबविण्यात येणार असलेची माहिती शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक अनिल गुजर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

शहरात पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे. वाहनांची संख्या वाढल्याने शहरात ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. काही वाहनधारक नियमबाह्य वाहने चालवून वाहतुकीस अडथळा निर्माण करीत असल्याचे शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक गुजर यांच्या निदर्शनास आले होते.

त्यानुसार त्यांनी मंगळवारी (दि. २०) दिवसभरात कावळा नाका, दाभोळकर कॉर्नर, मध्यवर्ती बसस्थानक, व्हीनस कॉर्नर, शिवाजी पुतळा, रंकाळा टॉवर, संभाजीनगर, सायबर चौक, कसबा बावडा, आदी परिसरांत वाहन तपासणी मोहीम राबविली. यावेळी झेब्रा क्रॉसिंगवर, स्टॉप लाईनवर वाहन उभे करणे, डावी लेन मोकळी न ठेवणे, सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करणे, एकेरी मार्गावर वाहन चालविणे, तिब्बल सीट,‘दादा’,‘मामा’, ‘आई’, ‘राम’, ‘पाटील’, ‘बॉस’ यासह अन्य फॅशनेबल नंबरप्लेट वाहनांवर लावून बिनदिक्कतपणे वावरणाºया वाहनचालकांवर कठोर कारवाई केली. सर्व नागरिक, वाहनचालकांनी वाहन चालविताना विहित नमुन्यातील मापदंडांप्रमाणे वाहनांची नंबरप्लेट बसवावी. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करू नये, सोबत योग्य ती कागदपत्रे बाळगावीत व कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन निरीक्षक गुजर यांनी केले आहे.कारवाई टप्पा (कंसात आकडेवारी)रहदारीस अडथळा (११८), वाहन परवाना नसणे (१८), तिब्बल सीट (४४), मोबाईल वापरणे (४०), नियमात नंबर प्लेट नसणे (९), प्रवेश बंद मार्गातून वाहन चालविणे (२७), सिग्नल तोडणे (१७), विरोधी दिशेने वाहन चालविणे (३), ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह (१), इतर (१२).

सीसीटीव्ही कारवाईशहरात सर्वत्र सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. नियमबाह्य वाहने चालविणाºया वाहनधारकांना कॅमेºयात टिपून त्यांचे छायाचित्रासह नोटीस घरपोहच पाठविली जाते. अशा ६९ नोटीसा निकाली काढल्या आहेत. आणखी १०१ नोटीस तयार आहेत. लवकरच त्या संबधीतांना पाठविल्या जाणार आहेत. १० वाहन चालविणेचा परवाना रद्द करण्यासाठी प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागास (आर. टी.ओ) सादर केला आहे, अशी माहिती निरीक्षक गुजर यांनी दिली.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसkolhapurकोल्हापूर