निर्बधांचे उल्लंघनप्रकरणी सव्वाचार लाखावर दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:19 IST2021-07-15T04:19:12+5:302021-07-15T04:19:12+5:30
कोल्हापूर : कोरोना कालावधीत प्रशासनाने लागू केलेल्या निर्बंधांचे उल्लघंन केल्याप्रकरणी जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात पोलिसांनी सुमारे ४ लाख ३४ ...

निर्बधांचे उल्लंघनप्रकरणी सव्वाचार लाखावर दंड वसूल
कोल्हापूर : कोरोना कालावधीत प्रशासनाने लागू केलेल्या निर्बंधांचे उल्लघंन केल्याप्रकरणी जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात पोलिसांनी सुमारे ४ लाख ३४ हजार रुपये दंडात्मक कारवाई केली. यामध्ये सुमारे दीड हजार वाहनांवर कारवाई केली आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. बुधवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी विनामास्कप्रकरणी १२०९ जणांकडून १ लाख ५६ हजार रुपये दंड वसूल केला. तर ११८६ वाहनधारकांवर मोटर व्हेईकल ॲक्टनुसार गुन्हे नोंदवून त्यांच्याकडून २ लाख ३७ हजार ९०० रुपये दंड वसूल केला. त्याशिवाय २७४ दुचाकी वाहने जप्त केली, ही वाहने दंड भरून आठवड्यानंतर मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. विनापरवाना अस्थापना सुरू केल्याप्रकरणी ५४ आस्थापनाधारकांकडून ४० हजार ५०० रुपये दंड वसूल केला.