प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली बँकांची वसुली

By Admin | Updated: June 9, 2016 00:14 IST2016-06-09T00:14:53+5:302016-06-09T00:14:53+5:30

यंदाचा खरीप हंगाम या आठवड्यात सुरू होत आहे. आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी पीककर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवीत आहे.

Recovery of Banks in the name of Process Charges | प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली बँकांची वसुली

प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली बँकांची वसुली

नितीन भगवान -- पन्हाळा नगरपरिषदेत पूर्वीपासून गटातटाचे राजकारण सुरू आहे. या गटांना एकत्र करून जनसुराज्य शक्ती पक्षाने गेली दहा वर्षे राजकारण केले; पण गट-तट त्यांना संपविता आले नाहीत. उलट प्रत्येक गटाला कोणत्या ना कोणत्या कारणास्तव गोंजारत बसल्याने गट प्रबळ झाले. या गटाच्या राजकारणात गावाकडे दुर्लक्ष झाले आणि गट सत्तेसाठी भांडू लागल्याने विकासकामे रखडली आहेत.
पन्हाळा गिरिस्थान नगर परिषदेची सत्ता गेली दहा वर्षे जनसुराज्य शक्ती पक्षाकडे आहे. २००८-२०१२ सालातील सत्ता संपूर्ण गावाने एकत्र येऊन बिनविरोध करून एकहाती दिली. २०१२ ते २०१६ साली निवडणूक होऊन त्यातही जनसुराज्य शक्ती पक्षाने बाजी मारली; पण या दहा वर्षांच्या कालावधीत या पक्षाने पन्हाळ्याचा विकास कोणताच केला नाही. उलट सत्ता संघर्षात दहा वर्षे वाया गेल्याने यावर्षी होणारी निवडणूक जनसुराज्य शक्ती पक्षाला वजा करूनच होण्याचे संकेत आहेत.
२००८ साली विनय कोरे यांनी आपण मंत्रिपदावर आहे, पन्हाळा शहराचा कायापालट करू असे आश्वासन दिल्याने संपूर्ण गाव एकत्र येऊन बिनविरोध निवडणूक करून त्यांच्या हाती सत्ता दिली. बिनविरोध निवडीमुळे महाराष्ट्र शासनाकडून विशेष बक्षीस स्वरूपात रक्कम देण्याचे त्यांनी आश्वासित केले, पण ती रक्कम आजअखेर आलेली नाही. ते मंत्री असल्याने पन्हाळावासीय पन्हाळा सुशोभीकरणासाठी आणि पुरातन खात्याची घरे बांधकामाची अट शिथिल होण्यासाठी मोठ्या आशेने त्यांच्याकडे पाहत होते; पण कोरे ते कोरेच, त्यांनी पन्हाळ््यासाठी कुठला शासकीय फंड दिला नाही, की पुरातन खात्याकडे प्रस्ताव दिला नाही.
यामुळे २०१२ च्या निवडणुकीत कोरेंना बऱ्यापैकी विरोध झाला आणि निवडणूक लागली; पण विरोधी बाजू राष्ट्रवादीची भक्कमपणे काम करू शकली नाही. यामुळे पुन्हा कोरेंच्या जनसुराज्य शक्ती पक्षाकडे सत्ता राहिली. नगराध्यक्ष पदाच्या सत्तेसाठी गट विभागले. यात मोकाशी गट प्रबळ ठरला. पहिल्या अडीच वर्षांत मागासवर्गीय अध्यक्ष पदातील सव्वा वर्ष विजय पाटील गटाला नगराध्यक्ष पद व सव्वा वर्ष मोकाशी गटाला नगराध्यक्ष पद मिळाले. त्यानंतरची अडीच वर्षे सर्वसाधारण नगराध्यक्ष पद राहिले. पुन्हा स्वत: असीफ मोकाशी विरुद्ध विजय पाटील असा सामना
झाला. यात प्रत्येकी सव्वा वर्षा ठरले; पण या निवडीवेळी मोकाशी यांचा विनय कोरेंनी केलेला अपमान ते विसरले नाहीत. पर्यायाने त्यांनी
आपल्या कार्यकालानंतर राजीनामा दिला नाही
आणि विनय कोरेंना आमदारकीमध्ये साथ दिली नाही. पर्यायाने मोकाशी गटामुळे त्यांचे आमदार पद गेले,
अशी तालुक्यात चर्चा होत आहे. मोकाशी यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाल्यावर आमदार
सत्यजित पाटील यांनी आपली ताकद त्यांच्यामागे उभी केली.
नगरपरिषदेस २००८-०९ साली संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात प्रथम पुरस्कार मिळाला, २०१५-१६ साली स्वच्छ भारत अंतर्गत हागणदारीमुक्त पुरस्कार प्राप्त झाला आहे. पन्हाळा शहरात पर्यटकांची वार्षिक भेट अंदाजे दहा लाख इतकी आहे. नगरपरिषदेचे कविवर्य गोरोपंत ग्रंथालय असून, या ठिकाणी ५० हजार पुस्तके उपलब्ध आहेत. अत्यंत दुर्मीळ ग्रंथ आणि पुस्तकांबरोबरच गोरोपंतांची हस्तलिखिते आहेत.

Web Title: Recovery of Banks in the name of Process Charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.