राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ३० लाख ५४ हजार रुपयांची थकीत रक्कम वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:26 IST2021-09-26T04:26:45+5:302021-09-26T04:26:45+5:30
मलकापूर : शाहूवाडी न्यायालयाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये विविध दिवाणी, फौजदारी, खटल्याची तडजोड , ...

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ३० लाख ५४ हजार रुपयांची थकीत रक्कम वसूल
मलकापूर : शाहूवाडी न्यायालयाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये विविध दिवाणी, फौजदारी, खटल्याची तडजोड , ग्रामपंचायत घरफाळा, पाणीपट्टी असे मिळून ३० लाख ५४ हजार ११७ रुपयांची विक्रमी वसुली झाली आहे.
शाहूवाडी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत आयोजित केली होती. लोक अदालतीचे उद्घाटन न्याय दंडाधिकारी एच. आर. पाटील यांनी केले. दिवाणी खटले १२ व फौजदारी खटले ११ असे मिळून २३ खटल्यांची तडजोड करून १० लाख ७२ हजार ४० रुपये वसूल करण्यात आले, तर तालुक्यातील १०६ ग्रामपंचायतींच्या गावातील नागरिकांनी घरफाळा व पाणीपट्टी असे मिळून १९ लाख ८२ हजार ७७ रुपयांची थकबाकी भरली. याप्रसंगी न्याय दंडाधिकारी एच. आर. पाटील, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, बार असोसिएशनचे ॲड. जे. एस. खटावकर, राजेंद्र काकडे, वाय. ए. शेळके, ए. पी. पवार, टी. एस. डोंगरे, विक्रम बांबवडेकर आदींसह ग्रामसेवक, विस्तार अधिकारी व पक्षकार उपस्थित होते.