शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकाकडून साडेअकरा हजार रुपये प्रामाणिकपणे परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 15:48 IST

कोल्हापूर येथील हॉकी स्टेडियम परिसरात सापडलेले ११ हजार ७०० रुपये शुक्रवारी जुनाराजवाडा पोलीसांकडे परत केले. अजित बापुसो ढेरे (वय ४९, रा. म्हाडा कॉलनी, कोल्हापूर) असे या प्रामाणिक रिक्षाचालकाचे नाव आहे. यानिमित्त पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या हस्ते ढेरे यांचा सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देरिक्षाचालकाकडून साडेअकरा हजार रुपये प्रामाणिकपणे परतराजवाडा पोलीसांकडून सत्कार

कोल्हापूर : येथील हॉकी स्टेडियम परिसरात सापडलेले ११ हजार ७०० रुपये शुक्रवारी जुनाराजवाडा पोलीसांकडे परत केले. अजित बापुसो ढेरे (वय ४९, रा. म्हाडा कॉलनी, कोल्हापूर) असे या प्रामाणिक रिक्षाचालकाचे नाव आहे. यानिमित्त पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या हस्ते ढेरे यांचा सत्कार करण्यात आला.अजित ढेरे गेली तीस वर्ष प्रामाणिकपणे रिक्षा व्यवसाय करतात. २० मार्चला दूपारी साडेचारच्या सुमारास पांढरे रंगाची पिशवी रस्त्यावर पडलेली मिळाली. त्यामध्ये ५०० व १०० रुपयांच्या नोटा असे पैसे दिसून आले. कोणाचीतरी पिशवी पडलेली असून चौकशीकरण्यासाठी येईल या भावनेने त्यांनी पैसे तीन दिवस आपलेजवळ ठेवले.

त्यांना पैशाची गरज असतानाही त्यांनी त्याला हात लावला नाही. त्यांनी सचिन पाडळकर, इम्रान मिस्त्री, अमोल जाधव, नंदु पाटील, काका कांबळे यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर शुक्रवारी जुनाराजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक जाधव यांची भेट घेवून त्यांचेकडे पैसे दिले.

त्यांनी पैशाच्या मालकाचा शोध घेतला असता ते अभिजित अनिल सासने (रा. संध्यामठ गल्ली, कोल्हापूर) यांचे असलेची खात्री झाली. त्यांना पोलीस ठाण्यात बोलवून सन्मानपूर्वक पैसे परत केले. रिक्षा चालक ढेरे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा पोलीसांनी सत्कार केला. यावेळी सासने यांनी ढेरे यांना बक्षिस दिले. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

 

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर