कारागृहातील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:03 IST2020-12-05T05:03:05+5:302020-12-05T05:03:05+5:30

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील खुल्या कारागृहातील कैदी उमेश सामंतच्या मृत्यूप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दोघा कैद्यांवर गुन्हा दाखल ...

Recorded answers from prison staff | कारागृहातील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले

कारागृहातील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील खुल्या कारागृहातील कैदी उमेश सामंतच्या मृत्यूप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दोघा कैद्यांवर गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी कारागृहातील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, सामंत हा खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. खुल्या कारागृहातील गोठ्यात २९ नोव्हेंबरला दुपारी तो चक्कर येऊन पडला. उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात छातीच्या बरगड्या तुटल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार त्याचा घातपात झाल्याचा संशय बळावला. त्यादिवशी त्याच्यासोबत असणाऱ्या राजू कांबळे व भीमराव शिंदे या दोघा संशयित कैद्यावर जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

Web Title: Recorded answers from prison staff