शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कोल्हापूर जिल्ह्यात विक्रमी पाऊस अन् नुकसान, पाच वर्षांतील सर्वाधिक नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 12:23 IST

पडझडीची संख्याही वाढली : २०२१ च्या तुलनेत नुकसानीचा आकडाही मोठा

कोल्हापूर : ऑक्टोबर महिना उजाडला तरी यंदा पाऊस सुरूच आहे. गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यात सरासरी १४८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक पाऊस यावर्षी कोसळला आहे. एक सारखा पाऊस राहिल्याने खासगी व सार्वजनिक मालमत्तांच्या पडझडीतही वाढ झाली असून २०२१ च्या तुलनेत नुकसानीचा आकडाही दोन कोटींनी वाढला आहे.यावर्षी मान्सून जून महिन्यात अगदी वेळेत हजर झाला. त्यामुळे खरीप पेरण्या वेळेवर झाल्या. जूनमध्ये जिल्ह्यात सरासरी २४९ मिलीमीटर पाऊस झाला. जुलै महिन्यात धुवांधार पाऊस कोसळला. महिन्याभरात पावसाने अक्षरशा झोडपून काढले. विशेष म्हणजे या महिन्यात सलग २४ दिवस पाऊस राहिल्याने सरासरी ७७१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.ऑगस्टमध्येही पाऊस राहिला, अधून मधून का असेना; पण सरासरी ३१८ मिली पाऊस झाला. सप्टेंबर महिन्यात तुलनेत कमी पाऊस राहिला; पण वार्षिक सरासरीच्या ८६ टक्के पाऊस झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस राहणार असल्याने वार्षिक सरासरी ओलांडली जाण्याची शक्यता आहे.कोल्हापूर जिल्ह्यात २०१९ च्या तुलनेत २०२१ ला महापुराने मोठे नुकसान केले; पण २०२१ ला सलग पाऊस राहिला नाही, आठ-दहा दिवसांतच एकदम पाऊस झाल्याने महापुराने शेतीसह नागरिकांचे कंबरडे मोडले होते; पण या कालावधीत सरासरी १४७७ मिलीमीटर पाऊस झाला होता.

गेल्या चार महिन्यांत असा राहिला पाऊस, मिलीमीटरमध्येजून : २५०जुलै : ७७१ऑगस्ट : ३१८सप्टेंबर : १४४

पाच वर्षांत असा राहिला पाऊस, मिलीमीटरमध्ये

वर्षसरासरी पाऊस पडझडीची संख्या झालेले नुकसान
२०२०१४०५७६७२.५१ कोटी
२०२११४७७२५२८११.७० कोटी
२०२२१३४२९४६३.३१ कोटी
२०२३९८७५०२१.५९ कोटी
२०२४१४८३ ४१८९१४.२० कोटी

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस