रासायनिक खताच्या किंमतीत विक्रमी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:22 IST2021-05-17T04:22:13+5:302021-05-17T04:22:13+5:30
सुनील चौगले आमजाई व्हरवडे : शेतीमालाचे भाव स्थिर असताना रासायनिक खतांच्या दरात पाचशे रुपयांपासून सातशे रुपयापर्यंत विक्रमी दरवाढ ...

रासायनिक खताच्या किंमतीत विक्रमी वाढ
सुनील चौगले
आमजाई व्हरवडे : शेतीमालाचे भाव स्थिर असताना
रासायनिक खतांच्या दरात पाचशे रुपयांपासून सातशे रुपयापर्यंत विक्रमी दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडणार असून शेती व्यवसायाचे बजेट कोलमडणार आहे. या खत दरवाढीने शेतकरी बेहाल झाला आहे.
गेले दोन वर्षे स्थिर असणारे रासायनिक खताचे दर भरमसाठ वाढल्यामुळे शेती व्यवसायाला होणारा खर्च याचा मेळ बघता शेती व्यवसाय हा आतबट्यातच येणार हे वाढलेल्या किमतीवरून स्पष्ट होते.
उसाला प्रतिटन मिळणारा तीन हजार दर दिसत असला तरी या खत दरवाढीने हा तीन हजार दरसुध्दा परवडणारा नाही. त्यामुळे शेती कशी करायची हा प्रश्नच शेतकऱ्यांसमोर उभा राहणार आहे.
केंद्र सरकार खत कपंन्याना सबसिडी देते, मात्र कच्च्या मालाचे दर वाढल्याने सर्वच खत कंपन्यानी दरवाढ केली आहे. सबसीडीतच वाढ केली तरच भविष्यात खताची दरवाढ कमी होऊ शकते. सध्या पाचशे रुपयापासून सातशे रुपये एवढी विक्रमी दरवाढ झाली आहे. आता खरीप हंगामाला सुरवात झाली आहे. मृग नक्षत्र जवळ येत असून खरीप हंगामाला व मृग नक्षत्रात शेतकरी खताचा मोठ्या प्रमाणात वापर करतो, मात्र या वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांचे बजेटच कोलमडून पडणार आहे.
शेतकऱ्यांना ऊस उत्पादनासाठी एकरी साठ हजार खर्च
प्रती टन तीन हजार रुपये ऊसाला दर दिसत असला तरी एक एकरात उसाचे उत्पन्न काढण्यासाठी नांगरट रासायनिक खत भांगलन उसाचे बियाणे व मशागत याचा विचार करता शेतकऱ्यांना एकरी साठ ते सत्तर हजार रुपये खर्च येतो त्यातच एखादे निसर्गाचे अस्माणी संकट आले तर शेतकरी पूर्ण उद्ववस्थच होतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काय पडते याचा राज्यकर्त्यानी विचार करावा तरच शेतकरी जगणार आहे.
कृषिमंत्री दादा भुसे यांचे केंद्र सरकारला पत्र
रासायनिक खतांच्या भरमसाठ दरवाढीने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. राज्यात कोरोणाची महामारी मोठ्या प्रमाणात सुरु आहे त्यामुळे महाराष्ट्रातील खंताचे दर कमी करावे अशी मागणी करत राज्याचे कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांनीकेंद्र सरकारला बारा एप्रिलला पत्र पाठवले आहे
कोट
शेतीमालाचे दर स्थिर असताना खताची झालेली दरवाढ शेतकऱ्यांना परवडणारी नाही. त्यामुळे आता एफआरपीमध्ये वाढ करून आधारभूत किमती वाढायला पाहिजेत तरच शेतकरी तरेल, अन्यथा शेतकरी उद्ध्वस्त होईल, याचा राज्यकर्त्यानी विचार करावा नाहीतर शेती व्यवसाय टिकणार नाही.
जांलदर पाटील प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना