पीक पाहणी नोंद तलाठ्याकडूनच करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:31 IST2021-09-16T04:31:45+5:302021-09-16T04:31:45+5:30
प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, तालुकाध्यक्ष दिलीप बेळगुद्री यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेटून हे निवेदन दिले. निवेदनात ...

पीक पाहणी नोंद तलाठ्याकडूनच करा
प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, तालुकाध्यक्ष दिलीप बेळगुद्री यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेटून हे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे, ई-पीक पाहणी नोंदीचा ॲप वापरण्यासाठी ॲण्ड्रॉईड मोबाईल विकत घेणे अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना शक्य नाही. असा मोबाईल हाताळण्याचे ज्ञान त्यांना अवगत नाही. डोंगराळ व दुर्गम भागात अद्यापही मोबाईल टॉवर नाहीत. तसेच ज्या ठिकाणी टॉवर आहेत त्या ठिकाणीही पूर्ण क्षमतेने रेंज मिळत नाही. त्यामुळे अशक्यप्राय ई-पीक पाहणीचा गोंधळ तातडीने थांबवावा.
शिष्टमंडळात बसवराज संभाजी, चेतन लोखंडे, अनंत शिंदे, बाबान्ना पाटील, बसवराज मुत्नाळे, रोहन पाटील, कांतू बेडक्याळे, शंकर यादगुडे, निजगोंडा पाटील आदींचा समावेश होता.
चौकट :
शिक्षण बंद..पीक नोंद कशी करणार?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. परंतु, डोंगर व दुर्गम भागातील शेतकऱ्यांकडे ॲण्ड्रॉईड मोबाईल आणि इंटरनेट / मोबाईल टॉवरची सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. अशा परिस्थितीत ई-पीक पाहणी कशी शक्य होणार. ? असा सवाल निवेदनातून विचारण्यात आला आहे.
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राजेंद्र गड्यान्नावर, दिलीप बेळगुद्री व कार्यकर्ते उपस्थित होते.
क्रमांक : १५०९२०२१-गड-१०