उत्तूर बाजारासाठी विक्रमी बोली
By Admin | Updated: April 2, 2015 00:39 IST2015-04-01T23:51:25+5:302015-04-02T00:39:10+5:30
पावणेपाच लाखांचा लिलाव : एक वर्षासाठी बाजाराचे नियोजन

उत्तूर बाजारासाठी विक्रमी बोली
उत्तूर : उत्तूर (ता. आजरा) येथील आठवडा बाजारासाठी एक वर्षासाठी पावणेपाच लाखांची बोली झाली. या लिलावात सातजणांनी बोली केली. मंगेश मधुकर देसाई (रा. उत्तूर) यांनी चार लाख ७५ हजारांची विक्रमी बोली केल्याने एक वर्षासाठी आठवडा बाजाराचे नियोजन त्यांच्याकडे राहणार आहे. सरपंच सुप्रिया पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या लिलावाची बोली ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आली.व्यापाऱ्यांना आठवडा बाजारात काढण्यात येणाऱ्या पावती रकमेमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ न करण्याचा लिलाव देण्यात आला. या लिलावामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात पावणेपाच लाखांची वाढ होणार आहे.
यावेळी उपसरपंच संजय उत्तूरकर, महेश करंबळी, ग्रामसेवक राजेंद्र नुल्ले, माजी सरपंच रमेश ढोणुक्षे, सदानंद व्हनबट्टे, अमृत पाटील, आदींसह ग्रामपंचायत सदस्य व लिलावधारक उपस्थित होते. (वार्ताहर)