कोल्हापुरात सारथीला उपमुख्य केंद्राची मान्यता द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 11:59 AM2021-07-09T11:59:34+5:302021-07-09T12:01:13+5:30

: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म व कर्मभूमी असलेल्या कोल्हापूरमध्ये त्यांच्या नावाने सारथी संस्थेचे उपकेंद्र सुरू झाले आहे. या केंद्रास उपमुख्य केंद्र म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी सकल मराठा समाज, कोल्हापूरतर्फे गुरुवारी सारथीचे अध्यक्ष अजितसिंह निबांळकर यांच्याकडे करण्यात आली.

Recognize Sarathi as Deputy Chief Minister in Kolhapur | कोल्हापुरात सारथीला उपमुख्य केंद्राची मान्यता द्या

कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी सकल मराठा समाजातर्फे सारथीचे अध्यक्ष अजितसिंह निंबाळकर यांची भेट घेऊन सारथीचे उपमुख्य केंद्रास मान्यता द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सारथीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, निबंधक अशोक पाटील, ॲड. गुलाबराव घोरपडे आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देकोल्हापुरात सारथीला उपमुख्य केंद्राची मान्यता द्या सकल मराठाची मागणी : लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त

 कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म व कर्मभूमी असलेल्या कोल्हापूरमध्ये त्यांच्या नावाने सारथी संस्थेचे उपकेंद्र सुरू झाले आहे. या केंद्रास उपमुख्य केंद्र म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी सकल मराठा समाज, कोल्हापूरतर्फे गुरुवारी सारथीचे अध्यक्ष अजितसिंह निबांळकर यांच्याकडे करण्यात आली.

सारथीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या गरीब मराठा समाजाची संख्या कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व सीमा भागात अधिक आहे. सारथीचा लाभ बहुसंख्य असणाऱ्या लोकांना मिळावा. यासाठी सारथीचे उपकेंद्र कोल्हापुरात स्थापन होणे गरजेचे आहे. त्यामुळे या उपकेंद्रास उपमुख्य केंद्र म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी सारथीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, निबंधक अशोक पाटील, ॲड. गुलाबराव घोरपडे, इंद्रजित सावंत, शशिकांत पाटील, संजय काका जाधव, अवधूत पाटील, संदीप देसाई, प्रताप नाईक-वरुटे, महादेव पाटील, शाहीर दिलीप सावंत, संतोष घाटगे, संदीप जाधव-देशमुख, किरण पडवळ आदी उपस्थित होते.


सारथीचे उपकेंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांसह विविध अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेतली. त्यातून या केंद्राला गती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शुक्रवारी शाहू छत्रपती यांचीही भेट घेऊन त्यांच्याशीही विचारविनिमय केला जाणार आहे. त्यातून सारथीचे काम गतिमान करण्यावर भर दिला जाणार आहे. तारादूतांच्या नेमणुकांसंबंधी व बालभारतीच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तकासंबधीही बुधवारी (दि. १४) ला होणाऱ्या बैठकीत निर्णय घेऊ, असेही अध्यक्ष निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: Recognize Sarathi as Deputy Chief Minister in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.