पानसरेंच्या हल्लेखोरांची रेखाचित्रे ओळखली

By Admin | Updated: March 17, 2015 00:34 IST2015-03-17T00:34:20+5:302015-03-17T00:34:30+5:30

रेखाचित्रात दिसणाऱ्या व्यक्तीसारखे दोन-तीन लोक हल्ल्याच्या अगोदर त्या परिसरात दोन-तीन दिवस फिरत होते

Recognize the drawings of Panesar attackers | पानसरेंच्या हल्लेखोरांची रेखाचित्रे ओळखली

पानसरेंच्या हल्लेखोरांची रेखाचित्रे ओळखली

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांची रेखाचित्रे स्थानिक नागरिकांनी ओळखली असल्याची माहिती गोपनीय सूत्रांनी दिली आहे, परंतु पोलिसांनी त्यास अधिकृत दुजोरा दिलेला नाही.पोलिसांनी हल्ला झाला त्या परिसरातील अनेक नागरिकांचे जाब-जबाब घेतले आहेत. त्यातील एका व्यक्तीने हल्लेखोर नेमके कसे दिसत होते यासंबंधीचे रेखाचित्र ओळखले आहे. रेखाचित्रात दिसणाऱ्या व्यक्तीसारखे दोन-तीन लोक हल्ल्याच्या अगोदर त्या परिसरात दोन-तीन दिवस फिरत होते. त्यामुळे त्यांना आपण पाहिल्याचे त्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले आहे. त्यानुसार हीच रेखाचित्रे पोलिसांनी शनिवारी रात्री उमाताई पानसरे यांना दाखवली; परंतु त्यांना ती ओळखता आलेली नाहीत. हल्ल्यानंतर त्या मानसिकदृष्ट्या एकदम कोरड्या झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना काहीच आठवत नाही. परिणामी रेखाचित्र ओळखण्यात अडचणी येत आहेत; परंतु पोलीस जोपर्यंत उमाताई रेखाचित्रांना दुजोरा देत नाहीत, तोपर्यंत ती प्रसिद्ध करू नयेत यावर ठाम आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Recognize the drawings of Panesar attackers