शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
3
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; नेमकं काय घडलं?
4
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
5
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
6
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
7
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
8
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
9
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
10
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
11
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
12
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
13
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
14
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
15
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
16
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
17
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
18
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
19
"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
20
धंगेकरांनी पक्षांतर केले याचे त्यांना भान नाही, ते विसरले आहेत; अजितदादांनी घेतला धंगेकरांचा समाचार

कोल्हापूर-शिर्डी रेल्वेला तत्त्वत: मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : धार्मिक स्थळ जोडणी योजनेअंतर्गत कोल्हापूरहून शिर्डीला रेल्वे सुरू करण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी दिल्ली येथे प्रभू यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी केली होती.कोल्हापूरहून सुटणाºया रेल्वेगाड्यांची संख्या तुलनेने कमी आहे. रेल्वेस्थानकाचे सुशोभीकरण, प्रलंबित विकासकामे, पायाभूत सुविधा याबाबत एकीकडे ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : धार्मिक स्थळ जोडणी योजनेअंतर्गत कोल्हापूरहून शिर्डीला रेल्वे सुरू करण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी दिल्ली येथे प्रभू यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी केली होती.कोल्हापूरहून सुटणाºया रेल्वेगाड्यांची संख्या तुलनेने कमी आहे. रेल्वेस्थानकाचे सुशोभीकरण, प्रलंबित विकासकामे, पायाभूत सुविधा याबाबत एकीकडे खासदार महाडिक यांनी पाठपुरावा सुरू केला असून देशातील महत्त्वाच्या शहरांना रेल्वेने जोडण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून खासदार महाडिक यांनी दिल्ली येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन कोल्हापूर-शिर्डी (साईनगर) अशी थेट रेल्वे सुरू करण्याची मागणी केली.कोल्हापूर ते नागपूर एक्स्प्रेस आठवड्यातून एकदा निघते आणि कोल्हापुरात पोहोचल्यानंतर मेंटेनन्सनंतर ही गाडी तब्बल ३२ तास मिरज स्टेशनच्या रॅकमध्ये उभी असते. या कालावधीमध्ये या रेल्वेचा वापर करून कोल्हापूर-शिर्डी सेवा सुरू करता येईल, असे महाडिक यांनी प्रभू यांच्या निदर्शनास आणून दिले. बुधवारी सायंकाळी चार वाजता ही गाडी कोल्हापुरातून निघाल्यास गुरुवारी पहाटे ५ वाजून ५० मिनिटांनी शिर्डीला पोहोचेल. तसेच गुरुवारी सकाळी शिर्डीतून निघून गुरुवारी रात्री उशिरा १२ ते १२.३० दरम्यान कोल्हापुरात पोहोचेल. यानंतर नियमित नागपूरच्या फेरीसाठी ही गाडी पुन्हा सज्ज राहू शकते. रेल्वेमंत्री प्रभू यांनी रेल्वे ट्रॅक व ट्रॅफिकची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यास सहमती दर्शवून, नव्या गाडीला तत्त्वत: मंजुरी दिली. रेल्वेचे एडीजीएम पी. डी. गुहा यांनी ही नवीन रेल्वे सुरू करण्यात तांत्रिक अडचण नसल्याचे सांगितले.सध्या मिरज-पंढरपूर धावणारी रेल्वे कोल्हापूरपासून सुटावी, आठवड्यातून दोनदा कोल्हापूर-अहमदाबाद रेल्वे सुरू करावी, अशीही मागणी महाडिक यांनी केली. यावेळी कोल्हापूर विभागीय रेल्वे मंडळाचे सदस्य समीर शेठ उपस्थित होते. कोल्हापूर, मिरज, कुर्डूवाडी, दौंड ते शिर्डी किंवा कोल्हापूर, मिरज, पुणे, दौंड ते शिर्डी या दोन मार्गांपैकी एका मार्गावरून ही रेल्वे सुरू होईल.