‘शरद’मध्ये आर्टिफिशिएल इंटेलिजन्स पदव्युत्तर अभ्यासक्रमास मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:26 IST2021-09-21T04:26:45+5:302021-09-21T04:26:45+5:30
यड्राव : येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजस अँड डेटा सायन्स व मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या ...

‘शरद’मध्ये आर्टिफिशिएल इंटेलिजन्स पदव्युत्तर अभ्यासक्रमास मान्यता
यड्राव : येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजस अँड डेटा सायन्स व मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या पदव्युत्तर पदवी (एम.टेक.) अभ्यासक्रमास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाकडून मान्यता मिळाली आहे. दोन्ही अभ्यासक्रमाच्या प्रत्येकी १२ जागांना मान्यता मिळाली आहे. पदवी अभ्यासक्रमासाठी ऑटोमेशन अँड रोबोटिक्स इंजिनिअरिंग (६० जागा) व इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग (१२० जागा) हे अभ्यासक्रम सुरू झाल्याची माहिती संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, गेल्या तेरा वर्षांपासून शरद इन्स्टिट्यूटने शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान व यशस्वी वाटचाल हे वाढीव जागेच्या रूपाने अधोरेखित झाले आहे. इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निकच्या अभ्यासक्रमांना ए.बी.ए. मानांकन मिळाले आहे. शरद अभियांत्रिकी हे ११ व्या वर्षी स्वायत्त (ॲटोनॉमस) होणारे पहिले महाविद्यालय आहे, तसेच आय.एस.ओ. प्रमाणपत्र व नॅकचे मूल्यांकनही मिळाले आहे. संस्थेला राज्यस्तरीय ऊर्जाबचतीचा प्रथम क्रमांकाचा अवॉर्ड, ग्रीन कॅम्पस अवॉर्ड, बेस्ट इमर्जिंग इन्स्टिट्यूट, छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार, आय.एस.टी.ई. बेस्ट चॅप्टर अवॉर्ड, आयकॉन्स ऑफ एज्युकेशन इन महाराष्ट्र, असे पुरस्कार मिळाले आहेत.
आर्टिफिशियल इंटेलिजस ही संगणक अभियांत्रिकीची शाखा असून, इंटेलिजस मशीनच्या विकासामध्ये मनुष्याप्रमाणे विचार करणे आणि कार्य करण्यास विशेष महत्त्व देते. सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता हे व्यवसायातील सर्वांत वेगाने वापरले जाणारे स्पर्धात्मक साधन बनत आहे.
औद्योगिक क्षेत्रात सध्या बहुअनुशासनात्मक शाखेचे ज्ञान असणाऱ्या अभियंत्यांची आवश्यकता आहे. त्यानुसार मेकॅनिकल व इलेक्ट्रॉनिक्स या दोन शाखा एकत्रित करून मेकॅट्रॉनिक्स तर इलेक्ट्रॉनिक्स व कॉम्प्युटर मिळून इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही नवीन शाखा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना या अत्याधुनिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचे बागणे यांनी सांगितले.
फोटो - २००९२०२१-जेएवाय-११-अनिल बागणे, डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर