उचगावच्या सेविका-मदतनीस यांनी केलेला सत्कार प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:15 IST2021-07-05T04:15:45+5:302021-07-05T04:15:45+5:30
: सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार व मानपत्र प्रदान लोकमत न्युज नेटवर्क उचगाव : कॉम्रेड गोविंदराव पानसरे (अण्णा) यांचे संस्कार आणि माजी ...

उचगावच्या सेविका-मदतनीस यांनी केलेला सत्कार प्रेरणादायी
: सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार व मानपत्र प्रदान
लोकमत न्युज नेटवर्क
उचगाव : कॉम्रेड गोविंदराव पानसरे (अण्णा) यांचे संस्कार आणि माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांचे उपकार, उचगाव बिटच्या सेविका-मदतनीस यांचे सहकार्य यामुळेच पर्यवेक्षिका म्हणून अंगणवाडी केंद्रातील सेविकांचे प्रश्न पोटतिडकीने सोडविले. उचगाव बिटमध्ये सर्व अंगणवाड्या स्मार्ट झाल्या आहेत. यातून उतराई होण्यासाठी सेविका-मदतनीस यांनी केलेला सत्कार प्रेरणादायी आहे, अशी भावना पर्यवेक्षिका सुरेखा कदम यांनी व्यक्त केल्या.
उचगाव (ता. करवीर )येथील सर्व अंगणवाडी सेविका- मदतनीस यांच्या तर्फे आयोजित सत्कार समारंभ व सेवानिवृत्त कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे सदस्य महेश चौगुले होते. यावेळी माजी सभापती सुनील पोवार, संतोष माने, उपसरपंच मधुकर चव्हाण, विनायक जाधव, सचिन देशमुख, ऊर्मिला वद्देर यांनी मनोगत व्यक्त केले. पर्यवेक्षिका सुरेखा कदम व अंगणवाडी कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्राचे माजी निदेशक मोहन सातपुते यांना गुरू-शिष्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पर्यवेक्षिका सुरेखा कदम, अंगणवाडी सेविका रेखा पाटील, सविता माने आणि अंगणवाडी सेविका शुभांगी कुंभार यांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास उचगाव बिटच्या सर्व सेविका-मदतनीस, सरपंच मालूताई काळे, दीपक रेडेकर, ग्रा. पं. सदस्या जयश्री रेडेकर, संगीता दळवी, कामगार नेते सुरेश केसरकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक स्नेहल सांगलीकर व आभार मोहन सातपुते यांनी मानले.
०४ उचगाव सत्कार
फोटो ओळ:
एकात्मिक बालविकास योजनेच्या उचगाव बिटच्या पर्यवेक्षिका सुरेखा कदम यांना मानपत्र प्रदान करताना जि. प. सदस्य महेश चौगुले, पं. स. सदस्य सुनील पोवार, उपसरपंच मधुकर चव्हाण, सुरेश केसरकर,मोहन सातपुते यांच्यासह सेविका-मदतनीस आदी.