शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान आवास योजनेचा पहिला हप्ता घेतला; पायादेखील नाही खोदला, कोल्हापुरात ३२ लाख केले वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 16:59 IST

कोणत्या तालुक्यात किती रुपये केले वसूल

समीर देशपांडेकोल्हापूर : पंतप्रधान आवास योजनेतून घर मंजूर झाल्यानंतरही अनेकांनी ते बांधायलाही सुरुवात केली नाही. त्यामुळे घर बांधण्यासाठी सुरुवातीला दिलेले प्रत्येकी १५ हजार रुपयांप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील २१० जणांकडून तब्बल ३२ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. २७ लाभार्थ्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्यासाठीही महसूल विभागाशी पत्रव्यवहार सुरू आहे.पंतप्रधान आवास योजनेसाठी सुरुवातीला २०११/१२ आणि नंतर २०१५/१६ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार घरे नसलेल्यांना टप्प्याटप्प्याने घरे मंजूर केली जात आहेत; परंतु यातील अनेकांनी घराच्या कामाला सुरुवातच केली नाही. अशांकडून ही वसुली सुरू करण्यात आली आहे.१५ हजारांचा हप्ता घेतला, पायादेखील नाही खोदलासन २०१६/१७ पासून मंजूर करण्यात आलेल्या १७ हजार ७९५ घरकुलांपैकी २३७ जणांनी घराचा पायादेखील खोदला नाही. घरकुल मंजूर झाल्यानंतर लगेचच लाभार्थ्याच्या खात्यावर १५ हजार रूपये जमा केले जातात. यातील अनेकांनी हे पैसेही उचलले आहेत; परंतु घर बांधणीला सुरुवात केली नाही.२१० लाभार्थ्यांकडून ३१ लाख ५० हजार वसूलज्यांनी १५ हजार रुपयांचे अनुदान घेतले; परंतु घर बांधायला सुरुवात केलेली नाही अशांना वारंवार स्मरणपत्रे पाठवण्यात आली; परंतु तरीही त्याला दाद न दिल्याने अखेर अशा घर न बांधलेल्यांकडून त्यांना अदा करण्यात आलेले ३१ लाख ५० हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत.

कोणत्या तालुक्यात किती?तालुका - लाभार्थी  - वसूल रुपयेआजरा  -  ३ -  ४५ हजारगगनबावडा  - ४ - ६० हजारभुदरगड - २२ - ३ लाख ३० हजारचंदगड - ५० -  ७ लाख ५० हजारगडहिंग्लज - २३ -  ३ लाख ४५ हजारहातकणंगले - १७ - २ लाख ५५ हजारकरवीर - ६१ -  ९ लाख १५ हजारपन्हाळा - ५ - ७५ हजारराधानगरी - २ - ३० हजारशाहूवाडी - २ - ३० हजारकागल - ११ - १ लाख ६५ हजारशिरोळ - १० - १ लाख ५० हजार

ज्यांना घरकुले मंजूर झाली आहेत आणि १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता अदा केला आहे अशा सर्वांना त्यांनी लवकर घरे बांधावीत यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे; परंतु तरीही बांधकाम सुरू न केलेल्यांकडून वसुली सुरू केली आहे. ज्यांना घरे मंजूर आहेत अशा लाभार्थ्यांनी कामे सुरू केली नसतील तर ती करावीत. - सुषमा देसाई, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना