शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सदावर्ते यांच्याविरोधात बंड; एसटी बँकेचे 14 संचालक नॉट रिचेबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 05:46 IST

सहा महिन्यांपूर्वी एसटी बँकेची निवडणूक झाली. याची चर्चा राज्यभरात झाली होती

लोकमत न्यूज नेटवर्क  कोल्हापूर : एसटी बँकेतील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून राज्यातील १४ संचालकांनी गुरुवारी सदावर्ते यांनी बोलावलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीला थेट दांडी मारली. आपले मोबाइल फोनही बंद ठेवले आहेत. त्यामुळे सत्तापालट होती की हे पेल्यातील वादळ ठरते. याबाबत एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे.

सहा महिन्यांपूर्वी एसटी बँकेची निवडणूक झाली. याची चर्चा राज्यभरात झाली होती. एसटी बँकेत एसटी कर्मचाऱ्यांच्या अधिकृत संघटनेला मात देऊन सदावर्ते यांनी आपले एकतर्फी पॅनेल विजय केले होते. बँकेची सत्ता आणि धुरा हाती आल्यानंतर ॲड. सदावर्ते यांनी कोणताही बँकिंग व्यवस्थापनाचा अनुभव नसताना आपले मेहुण्यास व्यवस्थापकीय संचालकपदावर नियुक्त केले. या कालावधीत बँकिंग व्यवहारावर रिझर्व बँकेनेही काही सूचना केल्या. मात्र त्यांचे पालन न करता उलट मनमानी कारभार केला. गेली काही महिन्यांपासून कोल्हापूरसह बऱ्याच शाखामधील व्यवहार ठप्प झाले आहेत. कर्ज, ठेवी व दैनंदिन आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. याबद्दल विधानसभेत आमदार रोहित पवार यांनी सरकारला कारवाई करण्याची मागणी केली होती. 

n राज्यभरातील एसटीच्या कर्मचाऱ्यांमधील नाराजी आणि दिवसेंदिवस वाढणारा संताप याचा विचार करून १९ पैकी १४ संचालकांमध्ये ॲड. सदावर्ते यांच्या कारभाराबद्दल नाराजी होती. n त्याचा परिणाम गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत दिसून आला. या १४ संचालकांनी बैठकीला उपस्थित न राहता थेट कोल्हापूरकडे जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये आहे.n विशेष म्हणजे कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणारे संचालक संजय घाटगे यांचा मोबाइल सुरू आहे, पण ते स्वीकारत नाहीत. ते ॲड. सदावर्ते यांच्याजवळ असल्याचे बोलले जात आहे.

बँकेच्या निवडणुकीत निवडून येताना ॲड. सदावर्ते यांनी व त्यांच्या पॅनलमधील सहकाऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार बँकेचे कामकाज सुरळीत झाले पाहिजे व दिलेली आश्वासनही त्यांनी पाळली पाहिजेत. बँक वाचली पाहिजे. एसटी कर्मचाऱ्यांच्या हा अस्मितेचा प्रश्न आहे.- उत्तम पाटील,विभागीय सचिव एसटी कामगार संघटना

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGunratna Sadavarteगुणरत्न सदावर्ते