रिॲलिटी चेक.... स्वच्छता अभियानानंतरही बसस्थानके चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:22 IST2020-12-22T04:22:49+5:302020-12-22T04:22:49+5:30
फोटो : २११२२०२०-कोल-सेंट्रल बस स्टँड०१,०२,०३ आेळी : राज्यातील सर्व एस. टी. बसस्थानकांमध्ये १ ते १५ डिसेंबरदरम्यान स्वच्छता अभियान राबविण्यात ...

रिॲलिटी चेक.... स्वच्छता अभियानानंतरही बसस्थानके चकाचक
फोटो : २११२२०२०-कोल-सेंट्रल बस स्टँड०१,०२,०३
आेळी : राज्यातील सर्व एस. टी. बसस्थानकांमध्ये १ ते १५ डिसेंबरदरम्यान स्वच्छता अभियान राबविण्यात आली. त्यात कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकाचाही समावेश होता. हे अभियान होऊन आठवडा उलटला तरीही हे बसस्थानकात नियमित स्वच्छता ठेवल्यामुळे अजूनही स्वच्छ आहे. यासाठी बसस्थानकात दहा सफाई कर्मचाऱ्यांकडून नियमित सफाई करून घेतली जाते. हे काम सातत्याने सुरू असते. त्यामुळे हे स्थानक स्वच्छता अभियानानंतरही स्वच्छ आहे.
रंकाळा बसस्थानक
फोटो : २११२२०२०-कोल-रंकाळा बस स्टॅंड
आेळी : कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारे व कागल,गगनबावडा, गारगोटी आणि कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची या बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे या बसस्थानकात स्वच्छता अभियानानंतरही सातत्याने सफाई कर्मचाऱ्यांद्वारे सफाई केल्यामुळे हे बसस्थानकही स्वच्छ आहे. मात्र, बसस्थानकाच्या परिसरात बसेस थांबतात, त्या ठिकाणी डांबरीकरण नसल्यामुळे बसेस आल्यानंतर धूळ उडते. त्याचा त्रास प्रवाशांना होत आहे.
संभाजीनगर बसस्थानक
फोटो : २११२२०२०-कोल-संभाजीनगर बस स्टँड
उपनगरांतील प्रवाशांच्या सोयीचे बसस्थानक म्हणून संभाजीनगर बसस्थानकाकडे पाहिले जाते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह लांबपल्ल्याच्या बसेसही या स्थानकातून सुटतात. मध्यवर्ती बसस्थानक व रंकाळा बसस्थानकाच्या तुलनेत या बसस्थानकात फारशी वर्दळ नसते. त्यामुळे या बसस्थानकात ठराविक वेळा सोडल्यानंतर शुकशुकाट असतो. त्यामुळे हे बसस्थानक कायम स्वच्छ असते. फलाट व प्रवाशी थांबण्याची जागा आणि स्वच्छतागृहेही स्वच्छ आहेत. याही बसस्थानकात बसेस थांबतात त्या परिसरातील डांबरीकरण करणे गरजेचे आहे.
कोट
सफाई कर्मचाऱ्यांकडून स्थानकाची सफाई कर्मचाऱ्यांकडून सातत्याने दोन सत्रांमध्ये दिवसभरात सफाई केली जाते. स्वच्छता अभियानातही विशेष काळजी घेऊन हे स्थानक आणखी स्वच्छ ठेवले.
अजय पाटील, आगारप्रमुख, मध्यवर्ती बसस्थानक, कोल्हापूर
प्रतिक्रीया
इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापुरातील सर्वच बसस्थानके स्वच्छ आहेत. रोजच्या प्रवासामुळे स्थानकात येणे होते. त्यामुळे सातत्याने सफाई कर्मचारी स्वच्छता करताना पाहतो.
- जितेंद्र कांबळे, कोल्हापूर