ग्रामीण भागात वसतिगृहांची खरी गरज
By Admin | Updated: February 25, 2015 00:08 IST2015-02-24T22:39:08+5:302015-02-25T00:08:55+5:30
ज्ञानेश्वर मुळे : मुळे अकादमीचा पहिला वर्धापनदिन उत्साहात

ग्रामीण भागात वसतिगृहांची खरी गरज
उत्तूर : सर्व शिक्षा अभियानामुळे सर्वांना शिक्षण मिळालेच आहे असे नाही. आजही ग्रामीण भागातील खेड्या-पाड्यात शिक्षण घेण्यापासून वंचित घटक आहे. त्यामुळे अशा दुर्लक्षित भागात वसतिगृहांची उभारणी केल्यास गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळू शकते, असे प्रतिपादन अमेरिकेतील भारतीय उच्चायुक्त ज्ञानेश्वर मुळे यांनी केले.उत्तूर (ता. आजरा) येथील ज्ञानेश्वर मुळे अकादमीच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त ते बोलत होते. प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन मुळे यांच्याहस्ते झाले. अकादमीतर्फे माजी जि.प. अध्यक्ष उमेश आपटे, वसंतराव धुरे, सरपंच सुप्रिया पाटील, उपसरपंच संजय उत्तूरकर, देशभूषण माने, रुक्मिणी कोळेकर, प्रा. रजनी भागवत, शिवलिंग सन्ने, अनंतराव आजगावकर आदींचा सत्कार करण्यात आला.
मुळे म्हणाले, मी जरी अमेरिकेत राहत असलो तरी माझे खरे प्रेम मातृभूमीत आहे. अमेरिकेत शिक्षणापासून कुणालाही वंचित ठेवले जात नाही. ही व्यवस्था अमेरिका सरकारने तयार केली आहे. भारतात अमेरिकेप्रमाणे व्यवस्था रूजवण्याची गरज आहे. खेड्यातील मुलांना शिक्षणाची संधी प्राप्त होवू शकत नाही. यासाठी उत्तूर येथे आनंद मोरे यांनी सुरू केलेल्या राजर्षी शाहू वसतिगृहाची मुहूर्तमेढ रोवली आहे. त्याचा लाभ घेवून वसतिगृहासाठी मदतीची अपेक्षाही मुळे यांनी व्यक्त केली.
यावेळी स्वाती अस्वले, पुंडलिक परीट, प्रा. रजनी भागवत, अशोक भोईटे यांची भाषणे झाली. अकादमीतर्फे सतीश नागरपोळे, समृद्धी कांबळे, पुंडलिक परीट या गुणवंतांचा सत्कार झाला. कार्यक्रमास डॉ. प्रकाश तौकरी, निर्मला व्हनबट्टे, धनाजी जाधव, भैरू निऊंगरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. आनंद मोरे यांनी सूत्रसंचलन केले. महेश करंबळी यांनी आभार मानले. (वार्ताहर)
५० हजार निधी संकलन
ज्ञानेश्वर मुळे यांनी उत्तूर येथील वसतिगृहाचे भाडे द्यावयाचे आहे. वसतिगृहाला सढळ हाताने मदत करावी, असे व्यासपीठावरून आवाहन केले. यावेळी ५० हजारापेक्षा जादा निधीची घोषणा उत्स्फूर्तपणे ग्रामस्थांनी उभे
राहून केली.
स्वागताची जय्यत तयारी
उत्तूर विद्यालय, उत्तूर येथील कार्यक्रमस्थळी झांजपथकाने मुळे यांचे स्वागत केले. परिसरातून आलेल्या शाळातील विद्यार्थी व पालकांनी एकच गर्दी केली होती. भव्य असा मंडप उभारला होता.